Breaking

Monday, 30 March 2026

पंढरपूर-फलटण व जेऊर आष्टी या मंजूर रेल्वे मार्गासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा; खासदार धैर्यशील मोहिते पाटील

 - 


नवी दिल्ली :

 खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभे मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्‍नांबाबत विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे सुविधा वाढविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर-फलटण व जेऊर आष्टी या मंजूर रेल्वे मार्गासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊन काम लवकर सुरू करावे, अशी मागणी केली.

सांगोला येथून पूर्वी सुरू असलेली किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ऊठच्) यांच्यामार्फत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देत ही सेवा लवकर सुरू करावी, असे त्यांनी नमूद केले. यामुळे शेतकर्‍यांना भाजीपाला व कृषीमाल देशभर पाठविणे सोपे होईल.

मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी

सांगोला तालुक्यातील : बामणी, जवळा पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव ,माढा तालुक्यातील लऊळ व म्हैसगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचे मागणी केली.

माढा जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेसचे थांबे द्यावे जेऊर स्थानकावर सोलापूर-अजमेर-सोलापूर विशेष गाडीला थांबा द्यावा.त्याच बरोबर कुर्डूवाडी रेल्वे जंक्शनवर चेन्नई-ङढढ, विशाखापट्टणम आणि राजकोट एक्सप्रेसला थांबे द्यावे अशी मागणी केली.

माढा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्‍नांना गती द्यावी रेल्वे सुविधा वाढवावी त्यामुळे माढा मतदारसंघाच्या
आर्थिक व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्‍वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.