Breaking

Thursday, 18 June 2026

नंदकुमार केंगार यांच्या निवासस्थानी एक्साईज कडून दहाड टाकल्याच्या निषेधार्थ होलार समाजाचे माळशिरस तहसीलला निवेदन

 





नातेपुते प्रतिनिधी : 

अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्या निवासस्थानी एक्साईज विभागाकडून धाड टाकून झाडाझडती घेण्यात आल्याच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी अकलूज विभाग व तहसीलदार माळशिरस तालुका यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की  नंदकुमार केंगार हे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रियपणे कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत एक्साईज विभागाकडून त्यांच्या निवासस्थानी धाड टाकून घराची झाडाझडती घेण्यात आली. 

सदर कारवाईच्या वेळी घरात कोणतेही पुरुष सदस्य उपस्थित नसताना घरातील महिला भगिनीशी अयोग्य व अवमानकारक भाषा वापरण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच ही कारवाई जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे हेतूने व सामाजिक, राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय निर्माण होत आहे. लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही नागरिकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करताना त्याची प्रतिष्ठा कुटुंबातील सदस्यांचा सन्मान आणि कायदेशीर प्रक्रियांचे पालन होणे आवश्यक आहे. परंतु या प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांच्या वर्तनामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

तरी आपण या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून घरातील महिलांशी असभ्य भाषा वापरणार्‍या तसेच अधिकारांचा गैरवापर करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कायदेशीर व कठोर कारवाई करावी. ही अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने नम्र परंतु ठाम मागणी आहे. अन्यथा अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल निवेदन देताना राज्य उपाध्यक्ष सुनील ढोबळे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख बाजीराव केंगार, ज्येष्ठ तालुका मार्गदर्शक ब्रह्मदेव केंगार, सांस्कृतिक विभाग प्रमुख लालासो गेजगे, तालुकाध्यक्ष शिवाजी होनमाने, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जावीर, तालुका मार्गदर्शक राजकुमार नामदास, तालुका संघटक भारत नामदास व प्रसिद्धी प्रमुख रणजीत नामदास उपस्थित होते.


फोटो नंदकुमार केंगार न्यूज