Breaking

Tuesday, 16 June 2026

सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी अतुल लुंगारे तर सचिवपदी साईश्‍वरी खडतरे

 




सांगोला वार्ताहर 

सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ संलग्न सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाची वार्षिक सभा एप्रिल मे मध्ये विद्यामंदिर प्रशाला विद्यामंदिर सांगोला येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सदर सभेमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली, त्यानंतर सन 2026 ते 2018 च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यानुसार शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे चे अतुल सुधाकर लुंगारे यांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तर न्यू इंग्लिश स्कूल सांगोला च्या श्रीमती साईश्‍वरी खडतरे यांची सचिव पदी सर्वानुमते दोन वर्षासाठी निवड करण्यात आली.

यांची निवड झाल्याबद्दल विज्ञान कार्यकारिणी ने त्यांना भावी कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. आपल्या नेतृत्वाखाली विज्ञान शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल व मंडळाच्या विविध उपक्रमांना नवीन दिशा मिळेल असा विश्‍वास विज्ञान कार्यकारीणीने व्यक्त केला.