Breaking

Tuesday, 16 June 2026

कोर्टी येथे विजेची तार तुटून ऊस जळाल्याने अंदाजे दहा लाखाचे नुकसान

 



सोनके/ प्रतिनिधी



कोर्टी येथील शेतकरी अभिजीत हाके यांचा सुमारे अडीच एकर क्षेत्रावरील ऊसविजेची तार तुटून उसावर पडल्याने ऊस आगीत जळून खाक झाला. उसासोबत ठिबक योजनेचे पाईपही जळाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले.

घटनास्थळावरील माहिती अशी; अभिजीत हाके यांच्याशिवारात यांचा सुमारे अडीच एकर क्षेत्रावर लागण केलेला ऊस होता. या क्षेत्रामध्ये विजेचा खांब त्यावरील तार तुटल्यानेउसाचे क्षेत्र असल्याने आग वेगाने पसरली.यामुळे उसाच्या शेताला आगीने वेढा घातला. वाढत्या उन्हामुळे आणि आगीच्या तीव्रतेमुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.

त्यामुळे ऊस जळून खाक झाला. शेतात बसवलेली ठिबकचा पाईपही जळून आर्थिक नुकसान झाले.

शेतकरी कष्टाने ऊस पिकाची जोपासना करत असताना हाके यांचा ऊस जळाल्याने त्यांना फटका बसला आहे. परिसरातील डोंगराला अज्ञातांकडून दरवर्षी आग लावली जाते.

घटनास्थळी महावितरण चे तालुका अधिकारी हरिदास मोरे, तलाठी,ग्रामसेवक, उपसरपंच बाबासाहेब हाके, महावितरणचे संभाजी रोकडे, वायरमेन रणदिवे व इतर स्टाफ दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.


तालुका अधिकारी पंचनामा, तलाठी पंचनामा, शेतकरी जबाब, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर अभिप्राय या सर्व गोष्टी पुणे पीडब्ल्यूडी विभागाकडे जाणार व त्यानुसार इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर झालेल्या नुकसान व आलेला अभिप्राय यानुसार नुकसान भरपाई सरकार देणार. नंबर नुसार किती महिने कालावधी लागेल सांगता येत नाही.

महावितरणचे तालुकाधिकारी हरिदास मोरे