सांगोला नगरी व माणदेश नगरीचे संपादक, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तसेच बांधकाम समिती, सांगोला नगरपरिषद सांगोलाचे सभापती मा. सतीश (भाऊ) सावंत यांचा वाढदिवस होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. मानाप्पा भडंगे यांच्या शिवतीर्थ निवास येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी केक कापून मा. सतीश (भाऊ) सावंत यांना शाल, मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना सतीश भाऊ सावंत यांनी होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही नेहमीप्रमाणे सहकार्य राहील तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. परेश खंडागळेही उपस्थित होते. त्यांचाही शाल, पुष्पगुच्छ व मानाचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. खंडागळे यांनी होलार समाजातील नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी २४ तास तत्पर राहण्याचे आश्वासन देत, “कधीही कॉल करा, तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव हजर आहोत,” असे सांगितले.
या प्रसंगी होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. मानाप्पा भडंगे (मा.मुख्याध्यापक), सचिव बिरू भंडगे, सहसचिव ह.भ.प. केशव हेगडे महाराज, उपाध्यक्ष विजयकुमार ऐवळे, नूतन उपाध्यक्ष विठ्ठल गेजगे, संघटक जनार्दन ऐवळे, प्रसिद्धी प्रमुख धनंजय भडंगे, कार्याध्यक्ष भारत जावीर (निवृत्त स.पो.फौजदार), कायदेविषयक सल्लागार ॲड. कविता भजनावळे, (य) मंगेवाडी गावच्या सरपंच शितल भडंगे, सचिन भडंगे,नियोजन समिती सदस्य धर्मराज गेजगे, सुनील जावीर,भजनावळे सर,अतुल केंगार सर,तसेच महेश जाधव हि यावेळी उपस्थित होते. सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
