नातेपुते -
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झाली असून 30 मार्च रोजी शंभू महादेवाला अभिषेक करणे साठी अवघड अशा मुंगी घाटातून हर हर महादेवाच्या गजरात दुपारी तीन पासून कावडी मुंगी घाट चढण्यास सुरुवात झाली सासवड येथील मानाच्या तेल्या भुत्याच्य कावडीने 5:30 वाजता शंभू महादेवाची आरती करून मुंगी घट सर करण्यास सुरुवात केली तेल्या भुत्याच्या कावडीने मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सायंकाळी सात वाजता सर केला कावड मुंगी घाट चढत असताना पावसाने हजेरी लावली मुंगी घाटातून कावड चढत असताना पावसाच्या सरी बरसू लागल्या ’म
भक्ती, निसर्ग आणि उत्साह यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला वरून राज्याची हाजरी आणि वातावरण झाले पूर्णपणे भक्तिमय आणि सर्व शिवभक्तांना भक्ती शक्तीचे दर्शन घडले यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर, उपसभापती मनीषा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन सिंह मोहिते पाटील, गौतम आबा माने, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, वैद्यकीय अधिकारी अभय मेहता, , नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, तालुका आरोग्य अधिकारी अभय मेहता, कोथळे गावचे पोलीस पाटील आगम आदी उपस्थित होते
कावडीच्या रांजनामध्ये आणलेल्या नदीच्या पाण्याने अभिषेक होणार शिखर शिंगणापूर या ठिकाणी चैत्रशुद्ध प्रतिपादा ते पौर्णिमेपर्यंत यात्रा मोठ्या प्रमाणात भरते येथे आपापल्या भागातील पवित्र नद्यांचे पाणी कावडीच्या दोन रांजणांमध्ये भरून आणले जाते अभिषेक म्हणून देवाच्या पिंडीवर धार घातली जाते
शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात शिखर शिंगणापूर मंदिर समुद्र सपाटीपासून 3200 उंचीवर असलेल्या पर्वतरांगावर हे अति प्राचीन व भव्य असे हे हेमांडोपंती शंभू महादेवाचे मंदिर असून सुंदर व भव्य असे मजबूत असलेले तटबंदी बांधकाम आहे
पोलीस बंदोबस्त आणि आरोग्यसेवा शिखर शिंगणापूर या ठिकाणी चैत्रशुद्ध प्रतिपादा ते पौर्णिमेपर्यंत यात्रा मोठ्या प्रमाणात भरते येथे या यात्रेमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत 6 पोलीस अधिकारी,82 पोलीस आमदार, 30 होमगार्ड पोलीस मुख्यालयाकडील 01 आरसीपी पथक असा पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर आरोग्याच्या दृष्टीने मोरोची, फोंडशिरस, मांडवे, मानकी, पिलीव, शंकर नगर या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मनुष्यबळ व यंत्रणा ठेवण्यात आली होती
मुंगी घाटातून कावड चढत असताना निसर्गानेही आपली उपस्थिती लावली. अचानक पडलेल्या पावसाच्या सरींनी वातावरण प्रसन्न केले. कावडधारकांच्या भक्तीत आणि उत्साहात या पावसाने आणखी भर टाकली. वरून राज्याची हाजरी लाभल्याने हा सोहळा अधिकच मंगलमय झाला
