कोळा येथे आ बाबासाहेब देशमुख मा आ दीपक आबा साळुंखे पाटील खंडू तात्या सातपुते यांचे जोरदार स्वागत विजयी सभा संपन्न
कोळा
कोळा जिल्हा परिषद गटातील सांगोला विकास आघाडीचे कोळा जिल्हा परिषदेचे उमेदवार केराप्पा उर्फ किरण भाऊ पांढरे हातीद पंचायत समिती गणाचे उमेदवार अमृत नारायण तात्या पाटील कोळा पंचायत समितीच्या उमेदवार सौ छायाताई सोपान कोळेकर या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून जिल्हा परिषदेत 3 जागेवर पंचायत समितीवर 9 जागा निवडून देऊन समितीवर वर्चस्व निर्माण केले आहे आघाडीच्या बहाद्दर कार्यकर्त्यांनी आबासाहेबांचा बालेकिल्ला कायम राखला असल्याचे प्रतिपादन आ बाबासाहेब देशमुख यांनी केले.
कोळा ता सांगोला येथे अर्जुन चौकात सांगोला विकास आघाडीचे उमेदवार यांच्या विजयी उमेदवार कोळा जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य किरण भाऊ पांढरे एखतपुर गटाच्या सौ सिंधुताई मोहन आलदर घेरडी गटाचे सौ संगीता आबा मोटे तसेच पंचायत समितीचे अमृत नारायण पाटील सौ छाया सोपान कोळेकर सौ सुवर्णा संजय नवले, सौ वंदना भरत शेळके सौ स्मिता दीपक गोडसे शिवाजी बापू जावीर सौ काजल मुकेश काशीद सौ पुनम सुदर्शन इंगोले अशोक नामदेव चोरमुले यांचा मोठा गुलाबाचा हार घालून नागरी सत्कार सोहळा आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आरपीआयचे खंडू तात्या सातपुते यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विजयी सभेस सर्व नेतेमंडळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले कोळा जिल्हा परिषद गटाने नेहमी आबासाहेब प्रेम केले आहे त्यांच्या विचाराला नेहमी साथ दिली आहे याचे समाधान आहे ग्रामदैवत लक्ष्मीदेवी रुद्रपशुपती कोळेकर महास्वामी ग्रामदैवत लक्ष्मीदेवी यांच्या पावन झालेल्या भूमीत सर्वसामान्य जनतेने तिन्ही जागा निवडून देऊन एक चांगले कार्य केले आहे याचा मला आनंद झाला आहे यश राजे साळुंखे पाटील यांच्या पराभवाने दुःख झाले आहे येणार्या काळात निश्चित शेतकरी कामगार पक्ष पाठीशी उभा राहून साथ देऊन भरपाई करून देणार आहे या पुढील काळात सर्वांना मिळून एकत्र आपल्याला काम करायचे आहे किरण भाऊ तुमची आता जबाबदारी वाढली आहे विजय सभेत लोकांची गर्दी पाहून प्रत्येक तरुणांमध्ये उत्साह दिसून येत होता माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील शेतकरी कामगार पक्षात या पुढील काळात आघाडी म्हणून एकत्र काम करणार असल्याचे शेवटी आ देशमुख यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील म्हणाले कोळे गावाने सांगोला तालुका विकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे साथ आघाडीचे उमेदवार विजयी केले त्यांचे अभिनंदन करतो एखाद्या पराभवाने मी खचून जाणारा कार्यकर्ता नाही सर्वांनी एकत्र येणार्या काळात काम करायचा आहे सांगोला तालुक्याच्या प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असणार असून दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान ठरलेल्या टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी उर्वरित कामे राहिलेल्या प्रत्येक शेतकर्याच्या बांधापर्यंत शेतीची पाणी पोचवण्यासाठी सर्वांना मिळून काम करावे लागणार आहे.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी मा आम साळुंखे पाटील यांनी सांगितले. यावेळी आरपीआयचे खंडू तात्या सातपुते यांनी परखड भाषण केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य किरण पांढरे म्हणाले सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करत राहणार आहे येणार्या काळात गोरगरीब लोकांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन जनतेसाठी माझ्या घराचे 24 तास दरवाजा उघडा असेल प्रत्येकाला न्याय देणे सर्वांना मदत करणे हे माझे काम राहणार आहे जर तीन महिन्याला सर्व अधिकार्यांच्या कोळा जिल्हा परिषद गटातील कामाचा आढावा घेणार सर्वसामान्य जनतेसाठी जनता दरबार भरून लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या निश्चित सोडवणार असल्याचे आमचे नेते आ बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सहकार्याने काम करणार जिल्हा परिषद सदस्य किरण भाऊ पांढरे यांनी सांगितले.
आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंखे आरपीआयचे खंडू तात्या सातपुते पाटील यांच्या स्वागतासाठी जिप्सी मधून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली हलगीच्या निनादात फटाक्याच्या आतिशबाजी विजय सभेत जोरदार स्वागत करण्यात आल विराट सभेला हजारोंची गर्दी जमली होती. या विजयी मेळाव्यास शेतकरी कामगार पक्ष आ बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कोळा जिल्हा परिषद गटातील कोळा जुनोनी किडबिसरी तिप्पेहळी गौडवाडी हातीद जुजारपूर हटकर मंगेवाडी पाचेगाव बुद्रुक कराडवाडी कोंबडवाडी काळुबाळूवाडी या गावातील सर्व सांगोला विकास आघाडीच्य निष्ठावंत कार्यकर्ते आघाडीचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
