Breaking

Tuesday, 25 November 2025

शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


 आनंदाभाऊ माने यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची क्रेझ जनतेत वाढली

सांगोला /प्रतिनिधी: 



जनसामान्यांचे नेते, युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक कार्यकर्ते,  राजकीय व अभ्यासू व्यक्तिमत्व शिवसेना शिंदे गटाचे सांगोला नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने यांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. होम टू होम प्रचाराला नागरिक व मतदाराकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आनंदा भाऊ माने यांची जनतेत क्रेझ वाढली आहे. आनंदाभाऊ माने यांच्या उमेदवारीला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनता व मतदार हेच आनंदाभाऊ माने यांची खरी ताकद आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आनंदाभाऊ माने यांनी आजपर्यंत सामाजिक प्रतिष्ठा व सामाजिक कार्य जोपासले आहे. क्रिकेट खेळाडूंसाठी त्यांनी स्पर्धा भरवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. सर्वसामान्य माणसाचा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आनंदाभाऊ माने यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावे 2015 पासून ठेव ठेवण्याचा संकल्प  केला असून आजपर्यंत अनेक कुटुंबांना याचा फायदा झाला आहे. गोरगरीब कुटुंबांना वेळप्रसंगी अडचणीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे मदत करणे हे त्यांचे मनाचे मोठेपण आजही आपल्याला पाहायला मिळते. 

सन 2016 च्या नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती कडून निवडणूक लढवून महायुतीचे आठ नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्षपद प्राप्त केले होते. सन 2025 च्या नगरपालिका निवडणुकीत स्वतः नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून 11 प्रभागात 23 नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यांची टीम चांगली असून शिवसेनेचे सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यासोबत त्यांची टीम,ज्येष्ठमंडळी युवावर्ग व कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदाभाऊ माने यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा निर्धार खुद्द जनतेनेच केला आहे. त्यामुळे आनंदाभाऊ माने यांना नगराध्यक्ष पदाची संधी व खुर्ची मिळणार आहे. ते या निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजयी होतील अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून समोर येत आहे.