Breaking

Sunday, 23 November 2025

वैदेही देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला 2,100 रुपये देणगी

 

सांगोला ( प्रतिनिधी )


 - आपुलकी सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी त्यांची कन्या वैदेहीच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला 2,100 रुपये देणगी देऊन आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला हातभार लावला आहे.

        गोडसेवाडी (सांगोला) येथील रहिवासी श्रीकांत देशपांडे हे आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य असून आपुलकीच्या सामाजिक कार्यात ते नेहमीच सहभागी असतात. त्यांची कन्या वैदेही एम.एस्सी. झाली असून तिच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला 2,100 रुपयांची देणगी देऊन आपुलकीच्या सामाजिक कार्याला हातभार लावला आहे. आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ सदस्य रमेशअण्णा देशपांडे यांच्या हस्ते वैदेहीचा वाढदिवसानिमित्त यथोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, श्रीकांत देशपांडे, महादेव दिवटे, अरविंद डोंबे, रमेश गोडसे, इंजि. विकास देशपांडे, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते.