नगराध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यपदासाठी 25 उमेदवारांचे अर्ज दाखल
सांगोला प्रतिनिधी -
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीनामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास उत्साहात सुरुवात झाली असून, 15 नोव्हेंबर झालेल्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासोबत विविध प्रभागांमधून एकूण 25 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 10 महिला व 15 पुरुष उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ यांनी दिली.
नगराध्यक्ष पदासाठी 5 अर्ज दाखल
प्रतिभा राघू घुटुकडे आम आदमी पार्टी
उमेश ज्ञानू मंडले अपक्ष
राहुल श्रीमंत इंगोले अपक्ष
आनंदा गोरख माने शिवसेना
राणी आनंदा माने शिवसेना
नगराध्यक्ष पदासाठी दोन प्रमुख पक्षांऐवजी अपक्ष उमेदवारांची नोंद लक्षणीय असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे. तसेच सदस्य पदासाठी दाखल झालेले अर्ज
2 अ अनु. जाती किशोर बाबुराव बनसोडे (अपक्ष)
3 ब सर्वसाधारण सचिन शंकर पवार (अपक्ष), अरुण विलास पाटील (शिवसेना/अपक्ष), महादेव तानाजी बनसोडे (अपक्ष)
4 अ सर्वसाधारण महिला उज्वला सचिन सादिगले (शिवसेना/अपक्ष)
5 अ ना.मा.प्र धनंजय सावता जाधव (अपक्ष), काशिलिंग दगडू गावडे (अपक्ष/शिवसेना), सुरज भवन शिंदे (अपक्ष), स्वप्नील विश्वंभर नागणे (अपक्ष)
5 ब सर्वसाधारण महिला छाया सूर्यकांत मिटकरी (शिवसेना/अपक्ष)
6 अ ना.मा.प्र महिला शारदा ज्ञानू राऊत (शिवसेना/अपक्ष)
6 ब सर्वसाधारण चैतन्य ज्ञानू राऊत (शिवसेना/अपक्ष)
7 अ ना.मा.प्र किशोर कृष्णा म्हमाणे (अपक्ष)
8 अ अनु. जाती महिला श्रद्धा रविप्रकाश साबळे (अपक्ष)
10 अ सर्वसाधारण महिला ज्योती आनंद घोंगडे (अपक्ष) / (शिवसेना)
10 ब सर्वसाधारण संतोष मधुकर महिमकर (अपक्ष)
11 अ ना.मा.प्र महिला ज्योती बाळासाहेब चोरमले (अपक्ष)
11 क सर्वसाधारण उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे (अपक्ष)
अर्ज दाखल करण्यासाठी पुढील दोन दिवस संधी
निवडणूक अधिकारी सैफन नदाफ यांनी सांगितले की, रविवार, दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी तसेच
पुढील दिवशीही नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : तहसील कार्यालय, सांगोला अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकृत
निवडणूक कार्यालयाचे जनतेस आवाहन
आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित रहावे
शिस्तबद्ध पद्धतीने नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण करावी
निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे
राजकीय वातावरण तापले
सांगोला नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना, आम आदमी पार्टी तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीची लढत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
