Breaking

Saturday, 18 October 2025

ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माजी आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट

*जिल्हाभर फटाके फुटत आहेत यापुढे आणखी मोठे फटाके तुटतील

सांगोला /प्रतिनिधी:  


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्व समाजाचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. मुख्यमंत्र्यांनी सातत्याने समन्वयाची भूमिका घेतली आहे. भाजप ओबीसीच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. भाजपने मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीच्या हक्काचे रक्षण करीत त्यांच्या हक्कावर गदा येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. असे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
 शिवाजीराव सावंत सातत्याने माझ्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझी चर्चा झालेली आहे. आज याठिकाणी सांगोल्यातील कार्यक्रमाच्या निमित्ताने आबांनी मला चहापानाचे निमंत्रण दिले. मी ते स्वीकारले. माजी आमदार दीपकआबांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा, मांडण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे.
माजी आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सांगोला तालुक्यातील दीपकआबा साळुंखे पाटील प्रेमी पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच- उपसरपंच, विविध संस्थांचे मान्यवर, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आबांचे चहापानाचे निमंत्रण स्वीकारून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जनसंवाद साधला. यावेळी दीपक आबांनीही पालकमंत्र्यांना चहापानासाठी निमंत्रित केल्याचे सांगितले. उपस्थितांना दीपावली निमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.