दैनिक सांगोला नगरीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त जनसमुदायाकडून संपादक सतीशभाऊ सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.
दैनिक सांगोला नगरीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील 65 कर्तृत्ववान मान्यवर व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कारदेऊन सन्मान
सांगोला/दशरथ बाबर ः
दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीश भाऊ सावंत यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील सामाजिक ,शैक्षणिक, धार्मिक, कृषी राजकीय, युवावर्ग ,शेतकरी, कलाकार, पत्रकार या क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. सतीशभाऊ सावंत यांच्यामुळेच सांगोला तालुक्याच्या विकासामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून भरीव असे योगदान दिले आहे. सतीश भाऊ सावंत यांनी दैनिक सांगोला नगरीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील व इतर तालुक्यातील विविध क्षेत्रातील संस्था, कर्तुत्ववान व्यक्ती यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. दैनिक सांगोला नागरीच्या माध्यमातून अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सांगोला तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करीत सतीशभाऊ सावंत हे नगरपालिका निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून वेगळेपण सिद्ध केले आहे. सध्या प्रत्येकाच्या जीवनात डिजिटल मीडियाचा सहभाग वाढत आहे. सतीशभाऊ सावंत हे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. बदलत्या काळानुसार दैनिक सांगोला नगरीने यापुढेही विकासाचे खूप मोठे काम करावे. सतीश भाऊ सावंत यांनी माणुसकी, राजकारण व विकासासाठी दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. सतीशभाऊ सावंत यांनी विविध क्षेत्रात काम करीत शून्यातून विश्व निर्माण केले आहे असे विचार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगोला येथे व्यक्त केले .
दैनिक सांगोला नगरी दैनिकाचा बारावा वर्धापनदिन व विविध क्षेत्रातील 65 मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगीकार्यक्रमाचे अध्यक्ष राजा माने यांनी आपले बहुमोल विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री महादेवजी जानकर, माजी नगराध्यक्ष पृथ्वीराज( भाऊ) चव्हाण,माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले , पोलीस निरीक्षक विनोद घुगे, माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संपादक सतीश सावंत,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, भाजप किसान मोर्चाचे ज्येष्ठनेते शिवाजीअण्णा गायकवाड,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते,माजी नगरसेवक किशोर बनसोडे याचीव्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले म्हणाले ,सध्या प्रसार माध्यमाचे युग आहे दोन तासात जगाच्या कानाकोपर्यातील घटना, प्रसंग आपल्या
पर्यंत पोहोचतात. सतीशभाऊ सावंत यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून दैनिक सांगोला नगरी तसेच दैनिक माणदेश नगरी ही दोन वृत्तपत्रे मोठ्या धाडसाने व जिद्दीने चालू ठेवून समाजमनात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी सर्वच क्षेत्राला खर्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. यापुढेही त्यांच्या हातून असेच भरवकार्य होत राहील असे विचार व्यक्त करीत सतीशभाऊ सावंत यांना सांगोला नगरीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले, दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीशभाऊ सावंत यांनी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दैनिक सांगोला नगरी वृत्तपत्र समाज मनाचा आरसा आहे. टीव्ही, पोर्टल, युट्युबच्या बातम्यापेक्षा वृत्तपत्रातील बातमीवर जनतेचा ठाम विश्वास आहे. आपल्या परिसरात घडणार्या घटना, बातम्या सांगोला नगरीच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सतत बारा वर्षे सतीशभाऊ सावंत यांनी पार पाडले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दैनिक सांगोला नगरीच्या दैनंदिन वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करीत दैनिक सांगोला नगरीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी प्रास्ताविकात माणगंगा भ्रमण सेवा संस्था वाढेगाव, सांगोला संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे म्हणाले, 2013 साली दैनिक सांगोला नगरी दैनिक सुरू झाले. संपादक सतीशभाऊ सावंत यांच्या जीवनात 2013 पासून सत्काराची मालिका सुरू झाली. त्यांना वृत्तपत्र क्षेत्रातील कार्याबद्दल विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पुरस्काराची त्यामध्ये भर पडत आहे. अनेक संकटे झेलत त्यांनी दैनिक सांगोला नगरी व दैनिक माणदेश नगरीची वाटचाल मोठ्या धैर्याने पुढे चालू ठेवले आहे. डिजिटल मीडियाचे राज्य अध्यक्ष राजा माने यांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. 2016 साली सतीशभाऊ सावंत यांनी नगरपालिके मधून अपक्ष निवडणूक लढवून नगरसेवक झाले. सतीशभाऊ सावंत यांनी माणसं जोडली आहेत. त्यांनी सांगोला नगरी वर्तपत्रातून समाजातील सर्वच घटकांना न्याय देत नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करून पत्रकारिता क्षेत्रात मोठी ताकद दिली आहे.
सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, स्व.ल.वि. भाकरे, स्व. भाऊसाहेब बिले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्रा. भीमाशंकर पैलवान, प्रा. राजेंद्र ठोंबरे यांनी केले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, पत्रकार बांधव, सरपंच -उपसरपंच, शिक्षक- शिक्षिका, महिला भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतीशभाऊ सावंत यांनी दैनिक सांगोला नगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगोल्यासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. दैनिक सांगोला नगरी वृत्तपत्रामुळे सांगोल्याच्या विकासासाठी हातभार लागला आहे. विविध क्षेत्रांना दैनिक सांगोला नगरीने न्याय दिला आहे. दैनिक सांगोला नगरीने आपले कार्य असेच पुढे चालू ठेवावे. कठीण परिस्थित संघर्ष करीत दैनिक चालवणे सोपे काम नाही
-ज्येष्ठ विधीज्ञ माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.पृथ्वीराज चव्हाण
दैनिक सांगोला नगरीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणण्याचे काम दैनिक सांगला नगरीचे संपादक सतीशभाऊ सावंत यांनी केले आहे. समाज परिवर्तनासाठी व विकासासाठी प्रसार माध्यम म्हणून दैनिक सांगोला नगरीने तालुक्याच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे:
माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे
दैनिक सांगोला नगरीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील 65 मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगावरून सतीशभाऊ सावंत यांचे विविध क्षेत्राशी असलेले जवळचे संबंध व या घटकासाठी त्यांचे असलेले योगदान लक्षात येते. हळूहळू वर्तमानपत्राचा वाचकवर्ग कमी होत आहे. सध्या डिजिटल मीडिया युग असले तरी दैनिका सारखी विश्वासहार्यता इतर माध्यमांमध्ये कमी प्रमाणात जाणवते. दैनिक सांगोला नगरी परिवार व संपादक सतीशभाऊ यांना या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करीत दैनिक सांगोला नगरीने उंच भरारी घ्यावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या .:
खासदार धैर्यशील मोहिते पाटील
दैनिक सांगोला नगरीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक सांगोला नगरी माध्यमाच्याद्वारे सतीश भाऊ सावंत यांनी खूप मोठी भरारी घेतली आहे. जगाच्या तुलनेत वृत्तपत्राचे प्रमाण सांगोला तालुक्यात खूप मोठे आहे. सन्मान व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना या पुरस्कारामुळे पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. वर्तपत्राच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम सतीश भाऊ सावंत यांनी यापुढे असेच अविरतपणे चालू ठेवावे :
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठनेते तानाजीकाका पाटील, सीए. के. एस. माळी, उद्योगपती सुरेश मिसाळ, उद्योगपती अनिलभाऊ इंगवले, माजी उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर, मेजर आनंद व्हटे,माजी सभापती बाळासाहेब काटकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नाविदभाई पठाण,माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे ,माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर, माजी नगरसेवक अस्मिर तांबोळी, माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, माजी नगरसेवक नाथा जाधव माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, अनिलनाना चव्हाण, युवानेते राजू मगर, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, होलार समाज संघटनेचे नेते दीपक ऐवळे,उद्योगपती बाळासाहेब झपके, उद्योगपती अमोल तुरे, प्रा. काकासाहेब नरूटे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगवले, प्रा. उत्तमराव घाटुळे, डॉ. अनिल कांबळे, धर्मराज बोराडे,संगीताताई चौगुले, वैशालीताई सावंत ,शिवसेना शहराध्यक्ष कमरुद्दिन खतीब, शिवसेनेचे युवानेते तुषार इंगळे, अक्षय रुपनर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गेजगे, जिल्हा संपर्कप्रमुख परमेश्वर गेजगे, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, शिवसेनेचे युवा जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, उद्योगपती अमरदादा लोखंडे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उद्योगपती योगेशदादा खटकाळे,सीबीएस न्यूजचे संपादक चांदभाई शेख, अॅड. गजानन भाकरे, सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी, अमोल लऊळकर ,अच्युत फुले, विश्वास सावंत, विशाल सावंत ,तानाजी गायकवाड, बापू गायकवाड ,सागर देशमुख, भगवान देशमुख, आबासाहेब यादव, संजय गुजर, राजेंद्र गुजर, सिताराम वाघमारे, बापूसो भाकरे, दादा कटरे, कृष्णा भोरे, दत्ता नवले, संपादक सचिन भुसे, संपादक किशोर म्हमाणे, पत्रकार छोटू दौंडे, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, दैनिक सांगोला नगरी परिवाराचे सर्व सदस्य यांची उपस्थिती होती.
दैनिक सांगोला नगरीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवर व संस्था यांना सन्मानपत्र, ट्रॉफी, शाल, पुष्पगुच्छ, देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवर व संस्था पुढीलप्रमाणे: माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला, आपुलकी प्रतिष्ठान सांगोला, दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अध्यक्ष व सचिव,माणगंगा भ्रमणसेवा संस्था वाढेगाव, लक्ष्मीदेवी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर सोनंद, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी, अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगोला, महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना, सूर्योदयमहिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगोला, लक्ष्मीदेवी देवस्थान सांगोला, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला, यमाई भजनी मंडळ सांगोला, ज्ञानदीप शिक्षक समूह सोलापूर, हलदहिवडी विद्यालय व जुनिअर कॉलेज हलदहिवडी, रविराजशेटे व सर्व पदाधिकारी सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना, या संस्थाना उल्लेखनी कार्याबद्दल आदर्श संस्था पुरस्कार देण्यात आले.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी नगरसेवक अरुण काळे, उद्योगपती सुनील धांडोरे, डॉ. परेश खंडागळे, डॉ. सुनील लवटे, उद्योजक सचिन कोडग, आरती यलमार, संगीता पाखरे, कांताराम बाबर गुरुजी, युवा उद्योजक प्रमोददादा साळुंखे, सिद्धेश्वर इंगोले, संस्थापक अनिल येलपले, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, शिवाजीराव इंगोले, अक्षय महामुनी, उद्योजक प्रशांत तेली, विजय इंगवले, जयंत डोंगरे, रेश्मा खतीब, मनीषा ठोंबरे, मनीषा शिरसाळे, वनिता इंगोले, जयश्री सावंत, रीना कदम, माधुरी जाधव, परमेश्वर धुरे, दिनकर घोडके, सूर्यकांत आदाटे, प्रतिभाताई पाटील, चेअरमन अर्चना इंगवले, हणमंत मिसाळ, मनोज खंडागळे, उद्योजक पिंटू बंडगर, सुभाष करांडे, डॉ. महावीर आलदर, तानाजी बनसोडे, सर्पमित्र संदेश पलसे, सोमनाथ खंडागळे, वंदना सरगर, डॉ. राज मिसाळ, अजितराव खराडे, गंगाधर फडतुरे, खंडू पाटील, प्रमोद डोंबे, संभाजी हरिहर, विजयमाला सावंत, वनश्री पाटील, कांताबाई इंगोले, किशोरी धोत्रे, शाहीर सुभाष गोरे, विकास जावीर, वैभव शेटे, डॉ.सचिन गवळी, संपतराव माने, साहेबराव देशमुख, महबूब पठाण, रविराज शेटे, रवींद्र मदने, मारुती खरात, यांच्यासह दैनिक सांगोला नगरी पत्रकार बांधव, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर, विविध वृत्तपत्राचे पत्रकार, महिला भगिनी, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
