Breaking

Saturday, 18 October 2025

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापिका डॉ. संजीवनी केळकर यांचे खूप मोठे योगदान : ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे

*माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या वास्तूचे उद्घाटन संपन्न

सांगोला /प्रतिनिधी:



 माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थापिका डॉ. संजीवनी केळकर यांनी खूप मोठे काम केले आहे .त्यांनी संपूर्ण जीवन या सामाजिक कार्यासाठी समर्पित केले आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून महिलांनी बंधारा बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडवून जलसंवर्धनाचे काम केले आहे. दगडी बंधाऱ्यापेक्षा सिमेंट काँक्रीट बंधारा जास्त दिवस टिकतो हे आम्ही माण खटाव तालुक्यात प्रथम निदर्शनास आणून दिले. देवेंद्र फडणवीस सरकारने यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याच्या बाबतीत जलक्रांती केली. पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले होते. उन्हाळ्यात ज्या ठिकाणी पाण्यासाठी टँकर सुरू होता त्या ठिकाणी आज ऊस तोडणीसाठी टोळ्याची मागणी होत आहे हे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेला मोठी ताकद देण्याचे काम करू. या सेवाभावी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या संस्थेच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. ज्यांचे उद्दिष्ट निर्मळ असते त्यांचे काम कधीही थांबत नाही. माण, खटाव तालुका दुष्काळमुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सरकार आपले असल्याने संस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही कामासाठी तपश्चर्याही महत्त्वाची आहे. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानने आता चिंता करायची गरज नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. संस्थेने बांधलेला बंधारा पाहयची इच्छा आहे असे विचार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला येथे व्यक्त केले. 
सांगोला येथे माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित ,उत्कर्ष पूर्व प्राथमिक विद्यालय सांगोला या संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा ग्राम विकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. शनिवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता हा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी मुकुंद कुलकर्णी म्हणाले, शिक्षक अनेक पिढ्या घडवतात. राज्यात झालेल्या अतिवृष्टी ग्रस्तांची स्थिती पाहून आपण दीपावली साजरी करावी. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख आहे असे माणनारे पालकमंत्री जयकुमार गोरे, आम. डॉ. बाबासाहेब देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे अतिशय चांगले नेते असून त्यांनी दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानले आहे. सर्वांनी देश प्रगतीपथावर नेण्यासाठी स्वदेशी बनवलेल्या वस्तूंचा वापर केला पाहिजे असे विचार मांडले.
यावेळी कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी नीलिमा कुलकर्णी म्हणाल्या , माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित, उत्कर्ष पूर्व प्राथमिक विद्यालय सांगोला या वास्तूचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पालकमंत्र्याकडे आम्ही दिवाळी भेट मागितली आहे. माता, पालक व महिलांचे सक्षमीकरण हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या नवीन वास्तूमध्ये बालक मंदिर व ज्युनिअर कॉलेज सुरू होत आहे .या संस्थेच्या माध्यमातून चांगला माणूस घडवण्याचे काम होत आहे. येथे उत्कृष्ट अध्यापन व उत्कृष्ट नियोजन याची सांगड घालण्यात येते. देणगीदाराच्या देणगीतून उत्कर्ष पूर्व प्राथमिक विद्यालय इमारत बांधकाम पूर्णत्वास आले. संस्थेच्या माध्यमातून सुमारे 100 महिला बचत गट चालवण्यात येत आहेत. संस्थेने जलसंधारणाची कामेही केली आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत संस्था अग्रेसर आहे असे विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व किसान मोर्चाचे शिवाजीअण्णा गायकवाड, फॅबटेक उद्योगसमूहाचे प्रमुख भाऊसाहेब रुपनर, डॉ.सतीश केळकर, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या संस्थापिका डॉ संजीवनी केळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार संतोष कणसे, डॉ. परेश खंडागळे, डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, भाजपचे ज्येष्ठनेते शशिकांत चव्हाण, संतोष पाटील, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, ॲड. सचिन देशमुख, दिलीप सावंत, नंदकुमार दिघे, डॉ मानस कमलापूरकर, शिक्षणाधिकारी सुयोग नवले, आयसीडीएसचे अभिजीत मौलाणे, तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, संस्थेच्या सचिव वसुंधरा कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख ,बाळासाहेब झपके, उल्हास धायगुडे, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, माजी सभापती संभाजीतात्या आलदर, ईश्वर भोसले, इंजिनिअर श्रीकांत भोसले, शालिनी कुलकर्णी आदीसह भाजपचे पदाधिकारी, मान्यवर ,कार्यकर्ते तसेच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचा पदाधिकारी उत्कर्ष विद्यालयाच्या सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित, उत्कर्ष पूर्व प्राथमिक विद्यालय या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. डॉ .केळकर व स्व.आम. गणपतराव देशमुख या दोन्ही कुटुंबांचे नाते जवळचे आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यात येईल: आम डॉ. बाबासाहेब देशमुख
2 attachment  •  Scanned by Gmail