Breaking

Saturday, 18 October 2025

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी राजकुमार पवार निवड*

उपाध्यक्षपदी पी.सी.झपके सर व सरचिटणीस पदी सुनील भोरे यांची निवड 


 सांगोला प्रतिनिधी :-


 सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नुकतीच जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली यामध्ये सांगोला तालुका मधील तिघांना प्रतिनिधित्व मिळाले असून राजकुमार पवार हे वरिष्ठ उपाध्यक्ष व पी.सी झपके उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सचिटणीस पदी सुनील भोरे यांना संधी मिळाले आहे.
 त्याचबरोबर नूतन तालुका अध्यक्षपदी अजयसिंह इंगवले निवडीबद्दल 
 माजी केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब,खासदार प्रणितीताई शिंदे, यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेबयांच्या मार्गदर्शना खाली सोलापूरचे प्रभारी,माजी आमदार श्री.मोहन जोशी साहेब शिपारसी नुसार जिल्हा अध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार यांनी वरील निवडी जाहीर केल्या आहेत