Breaking

Monday, 6 October 2025

पं.स.माजी सभापती बाळासाहेब काटकर यांचा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा

 बाळासाहेब काटकर यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस यांना पाठवले राजीनामा पत्र

सांगोला/प्रतिनिधी : 



सन .2000 पासून शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रीय झाल्या पासुन माझ्यावर सोपवलेली पक्षाची कर्तव्ये व जबाबदारी माझ्या कुवतीप्रमाणे प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा, तालुका, स्थरावर काम करणेची संधी दिल्याबद्दल पक्षाचे ऋण व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्षातील स्व. गणपतरावजी देशमुख, स्व जगन्नाथराव लिगाडे, यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सहकार्य व मदत केली.तसेच भाई जयंतराव पाटील यांनी विशेष प्रेम दिले. शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कमिटी सदस्य पदाचा शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असे राजीनामा पत्राद्वारे बाळासाहेब काटकर यांनी जाहीर केले आहे.