सांगोला/प्रतिनिधी ः
सोलापूर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे आलेल्या पुरात कित्येक कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. कुमार आशिर्वाद व जिल्हा उपनिबधंक, सहकारी संस्था, सोलापूर यांनी केलेल्या आवाहनानुसार सांगोला अर्बन बँकेंनी सोलापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त व बाधित कुटुंबाना रु. 2.00 लाखाची आर्थिक मदत केली आहे.
तसेच सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील कडलास, ता. सांगोला या गावातील मागासवर्गीय समाजाच्या एका वस्तीवर पावसामुळे 51 कुटुंबाची घरे व घरातील सर्व साहित्य पाण्याखाली वाहून गेल्याने तेथील बाधित व पूरग्रस्त कुटुंबास दैनंदिन वापरासाठी लागणारी दैनंदिन संसार उपयोगी भांडी खरेदी करुन रक्कम रु.50,000/- बँकेंकडून आर्थिक सहाय्याची मदत म्हणून दिली आहे. यावेळी बँकेंचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए के. एस. माळी, व्हा. चेअरमन श्री राजन चोथे संचालक सर्वश्री विष्णू लांडगे, रामचंद्र जाधव, सुरेश माळी, शहाजीराव नलवडे, शिवाजीराव गायकवाड, गोविंद माळी, संजय खडतरे, बँकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष वेळापुरे, अधिकारी आनंद शिवगुंडे, डॉ. गणपतराव देशमुख शेतकरी सुत गिरणीचे व्हा. चेअरमन अॅड. नितीन गव्हाणे, राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील, माजी डे. सरपंच समाधान पवार, युवक नेते निलेश अनुसे, प्रशांत तेली, भाजपा नेते शिवाजीराव ठोकळे, माजी. डे. सरपंच विजय ननवरे, गजानन ननवरे, जेष्ठ नेते विठ्ठल (बापू) गायकवाड, निलेश गायकवाड, गौरीशंकर ढेबे तसेच कडलास येथील ग्रामस्थ व पुरग्रस्त उपस्थित होते.

