मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न:
सांगोला/ प्रतिनिधी -
मुला मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले कराटे या खेळाचा इतिहास त्यांनी सांगितला. कराटे हा खेळ जपानमध्ये आत्मसंरक्षणासाठी केला जायचा. सध्या कराटेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ म्हणून पाहिलं जातं. मुलांनी मोबाईलचा वापर कमी करून आपल्या भविष्यावरती लक्ष केंद्रित करावे. कराटेच्या माध्यमातून तुम्ही थलेटिक्स मध्ये जाऊ शकता आणि आपले करिअर घडवू शकता. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन सोलापूरच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचा भव्य उद्घाटन समारंभ आज बंधन पॅलेस, वाढेगाव रोड, सांगोला येथे उत्साहात पार पडला.
या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींचा सहभाग असून जिल्हाभरातील शाळांमधील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक विनोद घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर नरेंद्र जाधव, क्रीडा अधिकारी सत्येन जाधव , क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड , राष्ट्रीय कराटे पंच जी. के. वाघमारे, राष्ट्रीय पंच आंतरराष्ट्रीय खेळाडू नीजेंद्र चौधरी , ज्येष्ठ कराटे मार्गदर्शक सुनिल वाघमारे, राष्ट्रीय पंच कु. श्रावणी वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय पंच आंतरराष्ट्रीय खेळाडू ,कराटे जिल्हाध्यक्ष जी .के. वाघमारे, राष्ट्रीय पंच आंतरराष्ट्रीय खेळाडू कराटे जिल्हाध्यक्ष जी.के. वाघमारे , मनोज राऊत , मयंक स्वामी व आशिष काळे यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी सर्व खेळाडू, पंच व क्रीडा शिक्षक यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध वयोगटातील कुमिते व काता प्रकारातील सामने रंगतदार पार पडले. अतिशय पारदर्शकपणे कराटे स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कराटे खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. ची माहिती जिल्हा कराटे अध्यक्ष जी .के. वाघमारे यांनी दिली.

