Breaking

Monday, 6 October 2025

सांगोला नगरपालिका नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग ,ओबीसीसाठी जाहीर

 सांगोला/प्रतिनिधी:




सांगोला नगरपालिका निवडणुक 2025 साठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सांगोला नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2016 साली पार पडली होती. याचा कालखंड 2021 आली संपला होता.

परंतु कोरोना सारख्या महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 2016साली सांगोला नगरपालिकेसाठी खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्षपद महिलेसाठी जाहीर झाले होते. त्यावेळी लोकनियुक्त महिला नगराध्यक्षपदासाठी आरक्षण पडले होते. सध्या सन 2025 च्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे जाहीर झाले. यामध्ये सांगोला नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपद हे ओबीसीकरिता नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे ओबीसी समाजातून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारातून आनंद व्यक्त केला जात आहे.

सांगोला नगरपालिकेसाठी एकूण 11 प्रभागातून 23 उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत. या निवडणुकीत एकूण 23 उमेदवारांना नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. यामध्ये 12 महिला उमेदवार व 11 पुरुष उमेदवार नगरसेवक म्हणून निवडले जाणार आहेत.