Breaking

Thursday, 18 June 2026

वाटंबरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ शोभा पवार यांची बिनविरोध निवड.


वाटंबरे,/प्रतिनिधी 

वाटंबरे येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ शोभा विजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्या विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत. या निवडीमुळे गावातील शेतकरी व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री गोसावी साहेब आणि सचिव श्री दिवसे भाऊसाहेब यांनी काम पाहिले. यामध्ये सौ शोभा पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल संचालक मंडळ, सभासद तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

निवडीनंतर बोलताना सौ पवार यांनी सोसायटीच्या प्रगतीसाठी पारदर्शक कारभार, शेतकरी हिताच्या योजना आणि सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याची ग्वाही दिली. तसेच सोसायटीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, गावातील मान्यवर, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ शोभा पवार यांच्या निवडीबद्दल विविध स्त
रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.