शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्ह्याची धुरा पुन्हा अमित पाटील यांच्याकडे
*सोलापूर,
शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख प्रतीक दादा शर्मा व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख महादेवजी सरवदे यांच्या नेतृत्वाखाली *श्री. अमित हनमंत पाटील,* यांची शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील एक वर्षापासून श्री. अमित पाटील जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत असून त्यांनी जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सोशल मीडिया टीम मजबूत केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारच्या योजना, पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. विरोधकांच्या अपप्रचाराला तथ्यांसह उत्तर देऊन पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे काम त्यांनी केले.
युवा कार्यकर्त्यांना तंत्रज्ञानाद्वारे पक्षाशी जोडणे, पक्षाच्या अधिकृत माहितीचे डिजिटल प्रसारण करणे व जिल्ह्यातील विकासकामे सोशल मीडियावर ठळकपणे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
निवड झाल्यानंतर श्री. अमित पाटील म्हणाले, "मा. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा आवाज अधिक बुलंद करेन. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेसाठी सोशल मीडिया हे प्रभावी शस्त्र बनवू".
शिवसैनिकांनी त्यांच्या निवडीचे ठिकठिकाणी स्वागत केले. जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
