Breaking

Saturday, 20 June 2026

राजुरी येथील माता लक्ष्मीदेवी मंदिरात चोरी; अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला



अजनाळे;  


सांगोला तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 2 लाख 41 हजार रुपयांचे दागिने व इतर साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मंदिराचे पुजारी रमेश भगवान गुरव (वय 52, रा. राजुरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन इसमांविरुद्ध बी.एन.एस. कलम 305, 331(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून 2026 रोजी रात्री 8 वाजेपासून 20 जून 2026 रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी देवीच्या अंगावरील अंदाजे एक किलो वजनाचा चांदीचा मुखवटा, ज्यावर सोन्याचा मुलामा व सोन्याचे डोळे आहेत, तसेच सोन्याचे मंगळसूत्र व पितळी पंचधातूचा घोडा असा एकूण 2 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेतील संशयित तीन चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पुढील तपास पोसई कांबळे करत आहेत.