Breaking

Friday, 15 May 2026

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी.

 


सांगोला : तालुका प्रतिनिधी 



सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात या मागणीसाठी शुक्रवार दि. 15 मे रोजी भारतीय जनता पार्टीचे सांगोला येथील सरचिटणीस सिद्धेश्‍वर गाडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिले आहे. शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणार्‍या ज्वलंत विषयाकडे या निवेदनाद्वारे गाडे यांनी लक्ष वेधले आहे. 

या निवेदनात सिद्धेश्‍वर गाडे यांनी शिक्षकांचे विविध प्रश्‍न मांडण्यात आले असून, नव्याने रुजू होणार्‍या शिक्षकांना पहिली तीन वर्षे अल्प वेतनावर असणारी शिक्षणसेवक ही योजना बंद करणे, 2005 पूर्वी अस्तित्वात असणारी जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षकांना लागू करणे, विनाअनुदानित व तासिका तत्त्वावरील शिक्षक अत्यल्प मानधनावर काम करतात त्यांचे मानधन वाढवून त्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्‍न सोडवणे, सेवेत असणार्‍या शिक्षकांना शैक्षणिक कामाबरोबर वारंवार होणारी ऑनलाइन व प्रशासकीय अतिरिक्त कामे बंद करणे, शाळांमध्ये मूलभूत सुविधा व डिजिटल साधनांची पूर्तता करणे, शिक्षक भरती प्रक्रिया उन्हाळी सुट्टीत पूर्ण करणे तसेच शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण होत आहे त्याचबरोबर सेवेवर असणार्‍या शिक्षकांना कामाचा प्रचंड व्याप लागत असल्याने रिक्त पदे त्वरित भरणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. शिक्षकांच्या या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. सिद्धेश्‍वर गाडे यांनी दिलेले हे निवेदन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावतीने त्यांचे विशेष कार्यसन अधिकारी संतोष साखरे यांनी स्वीकारले.यावेळी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रशम कोल्हे, जिल्हा संयोजक प्रशांत शिंपी, डॉ बी पी रोंगे, सरचिटणीस अमोल साखरे आदी उपस्थित होते.