Breaking

Thursday, 2 April 2026

भारताच्या क्रिकेट इतिहासातील पहिलं आणि अत्यंत मोठं राष्ट्रीय आंदोलन*

 


प्रफुल्ल कदम यांची महत्वपूर्ण घोषणा* 

16 एप्रिल पासून थेट  क्रिकेट मैदानावर बॉल फेको आंदोलन* 

देशातील गरीब-मध्यमवर्गीय लोक,शेतकरी,मजूर, खेळाडू, विद्यार्थी, अपंग या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्या*

हे आंदोलन म्हणजे गरीब मध्यमवर्ग विरोधात श्रीमंत असा हा उघड सामना आहे.... प्रफुल्ल कदम यांनी स्पष्ट केली भूमिका*

देशभरातील अनेक लोक होणार सहभागी* 

इउउख, चउअ, देशातील राज्य क्रिकेट संघटना काय घेणार निर्णय?* 

सांगोला/प्रतिनिधी ः

भारताच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एक मोठं राष्ट्रीय आंदोलन होत आहे. किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. या आंदोलनामध्ये त्यांनी देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण पाच मागण्या इउउख आणि चउअ कडे सादर केलेल्या आहेत. यामध्ये 

1)भारतात होणार्‍या खझङ,ढ-20, जपश ऊरू आदी सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये क्रिकेट सह सर्व प्रकारच्या खेळाडूंसाठी किमान पाच टक्के तिकिटे, शालेय व महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी किमान पाच टक्के तिकिटे आणि शेतकरी-कष्टकरी- कामकरी -मजूर लोकांसाठी किमान पाच टक्के तिकिटे राखीव ठेवण्यात यावीत;

2) इउउख,चउअ आणि विविध राज्यातील क्रिकेट संघटनांच्या एकूण उत्पन्नापैकी किमान 25 टक्के उत्पन्न प्रत्येक तालुक्यात क्रिकेटसह इतर सर्व खेळांच्या विकासासाठी व विस्तारासाठी थेट खर्च करण्यात यावा. 

3) देशातील क्रिकेट सह इतर सर्व खेळातील शालेय व प्राधिकृत संघटनांचे खेळाडू जे सरावाच्या वेळी किंवा स्पर्धेच्या वेळी जखमी होतात किंवा गंभीर आजारी पडतात त्यांच्या औषध उपचाराची व आरोग्याची सर्व जबाबदारी क्रिकेट संघटनांनी घ्यावी; 

4) क्रिकेट संघटनांनी त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी किमान एक टक्के निधी अपंग लोकांच्या क्रिकेटसाठी आणि त्यांच्या इतर खेळासाठी खर्च करावा; आणि

5) सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठी किमान पाच टक्के तिकिटे मोफत देण्यात यावीत.

 या महत्त्वपूर्ण मागण्यासाठी हे आंदोलन आहे. या मागण्यांचे राष्ट्रीय महत्व लक्षात घेऊन या सर्व मागण्या खिलाडूवृत्तीने 15 एप्रिल पर्यंत मान्य कराव्यात अन्यथा 16 एप्रिल पासून ज्या ठिकाणी खझङ क्रिकेट मॅच सुरू असेल त्या मैदानावर थेट बॉल फेको आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा प्रफुल्ल कदम यांनी दिला आहे.त्याच बरोबर इउउख,चउ- सह देशातील विविध राज्य क्रिकेट संघटनाच्या कार्यालयावरही बॉल फेको आंदोलन सुरू करणार असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.


हे आंदोलन जेवढे क्रिकेटसाठी आहे तेवढेच गरीब व मध्यमवर्गातील लोकांच्या आनंदासाठी व सन्मानासाठी सुद्धा आहे. या आंदोलना पाठीमागे खूप मोठा राष्ट्रीय विचार आहे. या मागण्या मान्य झाल्यास क्रिकेट खेळाचा सुयोग्य पद्धतीने विकास होईल, इतर खेळांनाही मोठी भरीव मदत मिळेल, क्रिकेट विश्‍वामध्ये जर चांगले बदल झाले तर देशभरात इतर विविध क्षेत्रात खूप चांगले बदल घडतील, महत्वाचे म्हणजे इउउख ,चउअ सह भारतातील विविध राज्य क्रिकेट संघटनांनाही यामुळे खूप मोठा आर्थिक फायदा होईल अशी अभ्यासपूर्ण माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली आहे. 

हे आंदोलन म्हणजे गरीब-मध्यमवर्ग विरोधात श्रीमंत असा हा उघड सामना आहे असे प्रफुल्ल कदम यांनी स्पष्ट केले आहे.महत्वाचं म्हणजे हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही शासनाच्या विरोधात नसून हे फक्त क्रिकेट बोर्डाशी निगडीत आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या,सर्व क्रीडा संघटनांच्या आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी क्रिकेट व इतर खेळांच्या विकासासाठी आणि गरीब व मध्यम वर्ग लोकांच्या आनंदासाठी व सन्मानासाठी या आंदोलनात उघडपणे सहभागी व्हावे असे आवाहन प्रफुल्ल कदम यांनी देशातील सर्व राज्यातील जनतेला केले आहे.


क्रिकेट हा आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा फार मोठा आधार आहे. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत या सर्वांना राष्ट्रीय ऊर्जा देणारा आणि गरीब, उपेक्षित, मध्यमवर्गीय घटकांना मानसिक आधार देणारा क्रिकेट हा फार महत्त्वाचा खेळ आहे. भारतातील मुला-मुलींना इतर खेळांकडे व व्यायामाकडे आकर्षित करण्यासाठी क्रिकेट हे खूप चांगले माध्यम आहे.अलिकडे क्रिकेट हा भारतात राष्ट्रीय भावपिंड तयार करणारा एक वेगळा राष्ट्रीय सण झाला आहे.त्याचबरोबर देशातील एक मोठा आर्थिक उपक्रमही झाला आहे. त्या दृष्टीने क्रिकेट खेळाचा विकास आणि विस्तार आणि त्यामध्ये सर्व समाज घटकांचा समावेश अत्यंत प्रामाणिकपणे, संवेदनशीलपणे आणि राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन झाला पाहिजे. त्यामुळे क्रिकेट खेळाचा विस्तार केवळ मोठमोठ्या शहरांपुरता व केवळ मूठभर श्रीमंत लोकांपर्यंत मर्यादित न राहता तो खेड्यापाड्यात आणि गरीब-मध्यमवर्गीय समाजातही झाला पाहिजे. भारतीय क्रिकेट विश्‍वात जर चांगले बदल झाले तर त्याचे चांगले परिणाम संबंध देशभर विविध क्षेत्रात दिसतील. असे मत प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केले आहे.