* 200 पैकी 200 गुण मिळवणारी स्वाती ही जिल्हयातील एकमेव विद्यार्थीनी *
सांगोला/प्रतिनिधी ः
प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचेमार्फत चालू वर्षी इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांसाठी सोलापूर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक शाळेने यात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महांकाळवाडी (कडलास) शाळेतील कु. स्वाती सुधीर गायकवाड हिने 200 पैकी 200 गुण मिळवून संपूर्ण सोलापूर जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला. दोन तास वेळ, 100 प्रश्न, एकदाही विचलित न होता सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे लिहून तिने 100% गुण मिळवले. ही खूपच कौतुकास्पद विलक्षण गोष्ट आहे. जिद्द, चिकाटी,परिश्रम, अचूक मार्गदर्शन याच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. यापूर्वीही स्वातीने मंथन प्रज्ञाशोध, एटीएस, आभिरूप अशा विविध स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे, तसेच याच शाळेतील कु. शर्वरी समाधान माने व आर्यन संतोष जाधव हे विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवून प्रज्ञापात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक संतोषकुमार निंबाळकर सर व सहशिक्षक अनिल शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या तिच्या यशाबद्दल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जि.प.सदस्या (कडलास) सौ.शोभाताई खटकाळे, पंचायत समिती सभापती सौ. पूनम इंगवले, उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती कडलास सदस्या सौ. राणीताई पाटील, सांगोला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, जवळा बीट चे विस्तार अधिकारी अमोल भंडारी, सांगोला बीट विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर, कडलास केंद्राचे केंद्रप्रमुख हमजु मुलाणी, कडलास गावच्या सरपंच सौ. सुनिताताई भजनावळे, उपसरपंच सौ. जयश्री गायकवाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान माने, उपाध्यक्षा सौ. बालिका गायकवाड, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व पालक, आपुलकी मित्र मंडळ कडलास यांनी तिचे व पालकांचे विशेष अभिनंदन करून तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सांगोला तालुक्यातील सर्व शिक्षकांकडून या उत्तुंग यशाबद्दल तिचे अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
