कोळा येथे लक्ष्मी देवी यात्रेच्या अनुषंगाने बैठक संपन्न..
सांगोला प्रतिनिधी
कोळा येथील महाराष्ट्र कर्नाटक लाखो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ग्रामदैवत श्रद्धास्थान श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेस येत्या सोमवार प्रारंभ होत असून कोळा चांगलं गाव आहे शांतता राखणारा गाव असून यात्रा सर्वांच्या सहकार्याने सुरळीत पार पडणे गरजेचे आहे कायदा कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही असा गंभीर इशारा दिला देत यात्रेसाठी पोलिसांचे सर्व टीमचे सहकार्य देऊ यात्रा शांततेत पार पाडली पाहिजे असे विचार सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
कोळा लक्ष्मी मंदिरात यात्रेच्या अनुषंगाने पोलिसांची बैठक
संपन्न झाली यावेळी सर्व नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक घुगे म्हणाले लक्ष्मी देवी यात्रोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे पालन सर्वांनी मिळून केले पाहिजे असे ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे आहे सुरक्षा आणि बंदोबस्त: गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणे, साध्या वेशातील पोलिसांची गस्त, आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे पाळत ठेवणे यावर भर दिला जाणार आहे वाहतूक व्यवस्थापन: यात्रेत वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आणि पर्यायी रस्ते निश्चित केले पोलिसांच्या सहकार्याने ग्रामपंचायत यात्रा कमिटीने केलेच पाहिजेत. अतिक्रमण देवीचा छबिना पालखी मार्ग किंवा यात्रा मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे तत्काळ काढण्यात याव्यात भाविक भक्तांना त्रास होऊ नये अशी सक्त सूचना दिल्या शांतता समिती स्थानिक यात्रा कमिटी, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिकांसोबत बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले जाते यात्रा काळात वादविवाद करून भांडण तंटे कोण करत असेल कायदा कोणी हातात घेतला तर त्याला सोडलं जाणार नाही असा इशारा ही त्यांनी यावेळी दिली सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.असे घुगे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी तुकाराम दादा आलदर बोलताना म्हणाले कोळा ग्रामपंचायत यात्रा कमिटी मंदिर समितीच्या च्या वतीने यात्रेचे योग्यप्रकारे नियोजन कोळा ग्रामपंचायत यात्रा कमिटी लक्ष्मी देवी ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्यावतीने नियोजन चांगले सुरू आहे. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडणार असे आश्वासन दादांच्या वतीने देण्यात आले.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा मंदिर समिती ट्रस्ट व यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी, माजी सभापती संभाजी तात्या आलदर जिल्हा परिषद सदस्य किरण भाऊ पांढरे,ज्येष्ठ नेते सोपान कोळेकर,बिरा आलदर पंच माजी सरपंच सिताराम सरगर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आलदर पत्रकार जगदीश कुलकर्णी माजी सरपंच शहाजी हातेकर अध्यक्ष संतोष करांडे,राजेंद्र देशमुख, प्रा कुंडलीक आलदर, प्रा मारुती सरगर, आबा आलदर, गटनेते रमेश कोळेकर, विठ्ठल कोळेकर, संतोष करांडे, पै हरी सरगर, युवा नेते साजिद आतार, बिरू सरगर,तातोबा सरगर, समाजसेवक समाधान बोबडे,डॉक्टर सादिक पटेल,महादेव पुजारी, एल आय सी अनिल सरगर, दादा मोठे, दगडू कोळेकर, दगडू सरगर, हरी बोबडे, यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
यावेळी कोळा बिटचे पोलीस एपीआय चंद्रकांत पुजारी हवालदार प्रकाश कोष्टी, सचिन वाघ, केदारनाथ परमशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, पोलीस पाटील प्रवीण हातेकर कोळा बीटचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सर्वांचे स्वागत जि प सदस्य किरण भाऊ पांढरे तर प्रास्ताविक संभाजी तात्या आलदर तर आभार तुकाराम दादा आलदर पुढारी यांनी मानले.
