Breaking

Wednesday, 1 April 2026

मंगळवेढा तालुक्यात डिजिटल मीडिया संघटनेची नवी धुरा; अध्यक्षपदी पोपट इंगोले

 


मंगळवेढा/प्रतिनिधी



अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी पोपट इंगोले यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ही बैठक ही बैठक संस्थापक अध्यक्ष राजमाने राज्याध्यक्ष सतीश सावंत जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली या निवडीमुळे तालुक्यातील डिजिटल माध्यम क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने म्हणाले

अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना ही देशभरातील डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकार, संपादक आणि मीडिया प्रतिनिधींचे संघटन असून, या क्षेत्रातील पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या व्यावसायिक प्रगतीस चालना देणे तसेच डिजिटल माध्यमांची विश्‍वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पत्रकारितेची वाढती भूमिका लक्षात घेता, या माध्यमाला योग्य दिशा देणे आणि समाजहिताच्या चौकटीत कार्यरत ठेवणे ही काळाची गरज बनली आहे असे सांगितले सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी  यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व घटकांना एकत्रित आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पत्रकारितेतील नैतिक मूल्ये जपत समाजाप्रती जबाबदारीने काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या नियुक्तीप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत, महासचिव विकास भोसले यांच्यासह सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, उपाध्यक्ष सचिन दळवे, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मल्लिकार्जुन देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पुजारी, जिल्हा सल्लागार विक्रांत पंडित, जिल्हा कार्यकारी सदस्य संभाजीराव नागणे, सचिव संदीप लिगाडे, जिल्हा संघटक सुनील कसबे, सल्लागार अँड. बापुसाहेब मेटकरी तसेच सदस्यपदी नेताजी वाघमारे,सचिन हेंबाडे,कैलास रंनदिवे यांसह अनेक पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष राजा माने प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डिजिटल पत्रकारितेचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना, या माध्यमातून समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे आवाहन केले. तसेच संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन, प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन व आभार संभाजी नागणे यांनी मानले