Breaking

Thursday, 9 April 2026

सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

 सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर



 

सांगोला प्रतिनिधी 

: सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सदस्य, थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा किंवा अनर्हतेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना दिनांक 30 मार्च 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय, तलाठी कार्यालय व संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

 

निवडणूक कार्यक्रम

- नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची मुदत: 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 (11 व 12 एप्रिल सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00, तहसिल कार्यालय सांगोला येथे. 

- नामनिर्देशनपत्रांची छाननी: 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय सांगोला येथे. 

- उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत: 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत. 

- मतदान: निवडणूक लढविण्यात आल्यास मतदान 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहे. 

 

निवडणूक तपशील

- या पोटनिवडणुकीत एकूण 4 ग्रामपंचायतींसाठी 6 प्रभाग व 6 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. 

- अनकढाळ ग्रामपंचायत: सरपंच पदाची थेट जनतेतून निवड तसेच 3 सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक. 

- खवासपूर, चिणके व चिकमहूद ग्रामपंचायती: प्रत्येकी 1 सदस्य पदासाठी पोटनिवडणूक. 

- निवडणूक प्रक्रियेसाठी 2 निवडणूक निर्णय अधिकारी व 4 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हा प्रशासनाने संबंधित मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.