*विठाई को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे नाझरे येथे शानदार उद्घाटन संपन्न*
नाझरे प्रतिनिधी
आबासाहेब व वसंतराव अण्णा यांनी सांगोला तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली व आज त्याचे क्षेत्र वाढले असून नाझरे ता. सांगोला येथे विठाई क्रेडिट सोसायटीची चौथी शाखा सुरू होत असून, त्यांचा कारभार पारदर्शी आहे असे मत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उद्घाटन प्रसंगी नाझरे येथे मत व्यक्त केले.
नाझरे गावात मोठी बाजारपेठ असून, दोन बँका व तीन पतसंस्था कार्यरत असून, विठाई बँकेची उलाढाल सुमारे 50 कोटीची असून ते शेतीसाठी, उद्योगासाठी मदत करतात व संस्थेचे संस्थापक शिवाजीराव होनमाने पाटील यांचे दूध संकलनाचे ही मोठे काम आहे व त्यांचा उपयोग बँके कडे होत आहे. तसेच मान नदीत लवकरच टेंभूचे पाणी सोडू असेही आमदार बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तर संस्थापक शिवाजीराव होनमाने यांनी विठाई शाखेचा कारभार चोख असल्याचे प्रास्ताविकात सांगितले तर विठाई पतसंस्था ही शेतकर्यांसाठी असून त्याचा उपयोग उद्योग व्यवसायासाठी होईल व टेंभूचे पाणी मांडत सोडा अशी मागणी मा. उपसभापती सुनील चौगुले यांनी यावेळी केली.
कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना झोकून देऊन काम करा यश प्राप्ती होईल व नाजरे गावावर माझे प्रेम आहे व गावासाठी आपण उतराई होवू.
चेतन सिंह केदार सावंत सभापती शिक्षण व आरोग्य समिती सोलापूर.
सदर प्रसंगी मा जि प सदस्य अशोक शिंदे, दादाशेठ बाबर, शहाजीराव नलवडे, पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे, अमृत पाटील, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, मधुकर चौगुले, मदन रायचुरे, बसवेश्वर आदाटे, सुरेश काका चौगुले, पोपटराव गडदे, सरपंच डॉ. विजय सरगर, संजय सरगर, हनुमंत सरगर, शामराव वाघमारे, बापू दादा चौगुले, सूतगिरणी संचालिका सौ सीता देवी चौगुले पाटील, मानगंगा संचालक दादासो वाघमोडे, शिक्षक नेते अशोक पाटील, मा. उपसरपंच सुनील बनसोडे, पत्रकार रविराज शेटे, मार्केट कमिटी संचालक सूर्यकांत आधाटे, शाखाधिकारी राजू चौगुले, महेश विभुते, चेअरमन शिवाजी शिंदे, राजेंद्र बंडगर, बँकेचे शाखाधिकारी, कर्मचारी, ठेवीदार, हितचिंतक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी सर्वांचे आभार चेअरमन रणजीत होनमाने पाटील यांनी मानले.
