Breaking

Monday, 20 April 2026

छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायात सचिनचे प्रदापन यशस्वी..- अध्यक्ष चेतन सिंह केदार

 

धुकटे इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर व भांडी सेंटरचे नाझरे येथे शानदार उद्घाटन संपन्न..*

नाझरे प्रतिनिधी 



 कोणताही व्यवसाय अगर उद्योग धंदा करताना कमीत कमी नफा घेऊन, जास्तीत जास्त विक्री करा व मन लावून उद्योग करून, बारकाईने लक्ष देऊन व्यवसाय करून विक्री व नफा याची सांगड घाला व सचिन धोकटे यांनी छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायात यशस्वी प्रदापन केले व त्यामुळे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे जि.प. शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतन सिंह केदार सावंत यांनी नाझरे ता. सांगोला येथे धुकटे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स व भांडी स्टोअर या दुकानच्या उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव ढोबळे हे होते. 

 सुरुवातीस प्रास्ताविक शिक्षक दत्तात्रय कारंडे यांनी केले तर शिक्षक नेते अशोक पाटील, अध्यक्ष आप्पासाहेब गोंजारी, मा. उपसरपंच सुनील बनसोडे यांनी सचिन धोकटे यांचे काम कौतुकास्पद आहे असे सांगितले तर उद्योग, व्यवसाय करताना चांगली सेवा द्या व त्याकडे व्यवसाय म्हणून पाहू नका तसेच सचिनने मला अद्याप गिफ्ट दिले नाही ते लवकर द्यावे असे मत डॉ. शिवाजीराव ढोबळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. 

सदर प्रसंगी मा. उपसभापती सुनील चौगुले, प.स. सदस्य डॉ. सदाशिव दबडे, उद्योगपती सुभाष धोकटे, सचिन सादीगिले, अनिकेत सादगीले, दत्तात्रेय धोकटे, शंकर धोकटे, सुरेश धोकटे, भाऊ पाटील, सुरेश काका चौगुले, बसवेश्‍वर आदाटे, मदन रायचूरे, तानाजी सांगोलकर, सरपंच माऊली राऊत, डॉ विजय सरगर, संजय सरगर, नवनाथ बनसोडे, अक्षय सरगर, विनायक सरगर, माणगंगा संचालक दादासो वाघमोडे, मार्केट कमिटी संचालक सूर्यकांत आधाटे, पत्रकार रविराज शेटे,शिक्षक नेते मुकुंद पाटील, मा. उपसरपंच भारत शेळके, गणेश कमले, तात्यासो शिंदे, राजू चौगुले, बाळासो चौगुले, बाळासो खूळपे, धुकटे परिवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शुभम धुकटे यांनी आभार मानले.