सांगोला/प्रतिनिधी ः
पूर्ण सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याने कार्यरत असलेल्या डॉ.श्रीकांत फाउंडेशन तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वंदनीय मदत कक्षाच्या वतीने सतीश भाऊ रावसाहेब सावंत यांची पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी व अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड तसेच वैशालीताई सतीशभाऊ सावंत यांची सांगोला नगरपरिषद सांगोला पाणीपुरवठा सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मातोश्री प्रतिष्ठान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षयभैय्या महामुनी बोलताना म्हणाले, सतीश भाऊ यांनी जनतेच्या सेवेची कार्य आत्तापर्यंत तळागाळापासून सुरू केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची काम केले आहे. सतत जनतेच्या संपर्कात असणारे एकमेव व्यक्तिमत्व आहे. आत्तापर्यंत त्यांनी विविध पदे भूषवली आहेत आणि याच्यापुढेही त्यांच्याकडून जनसेवा अशीच व्हावी ही शुभेच्छा आणि जनसेवा पुढील काळात व्हावी असे मत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रविराज शेटे सर, नारीशक्ती जिल्हाध्यक्ष जयश्रीताई सावंत मॅडम, पारेचे माजी सरपंच संतोष पाटील, माधुरी दमानी, तालुकाध्यक्ष सुवर्णा मोरे, पृथ्वीराज महामुनी, अक्षय महामुनी मित्रपरिवार उपस्थित होते.
