Breaking

Sunday, 5 April 2026

सांगोला महाविद्यालय सुटा संघटना पदाधिकारी निवडी बिनविरोध

 

सांगोला /प्रतिनिधी -



  सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सोलापूर ) तथा  सुटा या  प्राध्यापक संघटनेच्या महाविद्यालयीन पातळीवरील पदाधिकारी निवडणूका नुकताच पार पडल्या .येथील सांगोला महाविद्यालयामध्ये सुटा अंतर्गत स्थानिक पदाधिकारी  निवडी बिनविरोध करण्यात आल्या.या महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. रामचंद्र पवार यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.मराठी विभागातील प्रा.संतोष लोंढे यांची कार्यवाह तथा सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तर रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. प्रकाश बनसोडे यांची खजिनदार म्हणून  बिनविरोध  निवड करण्यात आली. सुटा ( सोलापूर) संघटनेच्या घटनेप्रमाणे हे निवडून आलेले पदाधिकारीसुटा संघटनेचे जनरल कॉन्सील सदस्य असतील . त्यांची ही निवड 2026 ते 2028 अशी तीन वर्षासाठी असेल .विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू अशी प्रतिक्रिया नूतन पदाधिकार्यांनी दिली .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. डॉ.बबन गायकवाड यांनी कामकाज पाहिले.