सांगोला प्रतिनिधी -
निरंकारी मिशन चे तिसरे सद्गुरु युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांचा स्मृती ( दि- 24 / 4 / 1980) दिवस 24 एप्रिल हा मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांचे प्रेरणेतून रक्त हे मानवाच्या नाडी मध्ये वाहिले पाहिजे न की नाली मध्ये हा संदेश देत स्वतः रक्तदान करून रक्तदान करण्याची प्रेरणा दिली.
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे असीम कृपा आशीर्वादाने भव्य रक्तादान शिबिराचे आयोजन गुरुवार दि - 24 / 4 / 2025 रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 4:30वाजता या वेळेत होईल
संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन वतीने मानव एकता दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन , निरंकारी नगर , महुद रोड सांगोला येथे आयोजीत केले आहे या प्रसंगी सोलापूर झोनचे झोनल प्रमुख प.आ. इंद्रपालसिंह नागपाल जी व ब्रह्मज्ञान प्रचारक प.आ. चांदभाई तांबोळी जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे . रक्त संकलनासाठी सौ. सरजूबाई बजाज ब्लड बँक , पंढरपूर व दमाणी ब्लड बँक , सोलापूर येणार आहेत . रक्तदानाच्या प्रचार प्रसारासाठी गुरुवार दि - 23 / 4 / 2026 रोजी दुपारी 5:00 वाजता जणजागृतीसाठी सांगोला शहरातून भव्य मोटार सायकल रैलीचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्त, संत , सेवादल , बहन जी यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांचा आशीर्वाद प्राप्त करावा असे आव्हान सेक्टर संयोजक रावसाहेब सरगर सर यांनी केले आहे .
