सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला तालुका खते-औषधे-बी-बियाणे असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी रमेश अनुसे, उपाध्यक्षपदी दिनेश खटकाळे, सचिवपदी विनायक तोडकर तर खजिनदारपदी प्रवीण इंगोले यांची निवड करण्यात आली. सल्लागारपदी योगेश कुलकर्णी व सत्यवान घाटुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून दत्तात्रय बुरकुल, नाना माळी, सागर बिले, सुनील कोळवले, प्रवीण गव्हाणे, सुनील यमगर, समाधान काशीद, दत्ता मोरे, धीरज गांधी, राहुल खांडेकर, सुभाष लवटे, समाधान कोळेकर, अमोल सावंत, समाधान लेंगरे, भाऊ चौगुले आदींची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
