Breaking

Thursday, 16 April 2026

जुनोनी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शेकापचे संतोष चोरमुले व्हाचेअरमनपदी शेकापचे गोरख व्हनमाने यांची बिनविरोध निवड....


कोळा वार्ताहर 



सांगोला तालुक्यातील जुनोनी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या कै नारायण तात्या पाटील यांच्या आशीर्वादाने  चेअरमनपदी शेकापचे संतोष भीमराव चोरमुले  तर व्हा चेअरमन पदी गोरख दत्तू व्हनमाने यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पिठासन तथा निवडणूक अधिकारी अमर गोसावी यांनी जाहीर केले यावेळी सेक्रेटरी बाजीराव घेरडे यांचे सहकार्य लाभले. निवडीनंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच यावेळी हातीद पंचायत समिती गणाचे सदस्य युवा नेते अमृत पाटील यांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते नूतन चेअरमन व्हायचं चेअरमन यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी सर्व नेते सर्व संचालक मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुनोनी ग्रामपंचायत कार्यालयात नूतन चेअरमन व्हा चेअरमन निवडीची सभा घेण्यात आली तात्यांनी ठरवल्याप्रमाणे दिलेला कार्यकाळ संपल्याने मावळते चेअरमन बंडू व्हनमाने व व्हा चेअरमन विनायक व्हनमाने यांनी राजीनामा दिला त्यांच्या जागी  चेअरमन पदी शेकापचे संतोष चोरमुले व्हा चेअरमनपदी शेकापचे गोरख व्हनमाने यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

यावेळी अमृत पाटील सरपंच राजू पाटील डॉ सुधाकर व्हनमाने शिवसेनेचे अरविंद पाटील, बयाजी हाके, युवा नेते चैतन्य रुपनर,सदा रुपनर, उत्तम होवाळ,बाळू चोरमुले पांडुरंग व्हनमाने, तानाजी चोरमुले, संजय व्हनमाने, विलास व्हनमाने, पै विलास व्हनमाने, हरी हाके, दादा चोरमुले, विनायकराव  व्हनमाने, शिवाजी शिंदे, राजेंद्र व्हनमाने, बंडू नाना व्हनमाने, नारायण खंडागळे, नाना व्हनमाने, बंडू शेळके, तानाजी कांबळे, दगडू व्हनमाने, महादेव व्हनमाने, तानाजी वाघमोडे, पप्पू काळे, विनोद वायरमन व्हनमाने, दगडू टेलर,व्हनमाने, रावसाहेब व्हनमाने, इंदाबाई व्हनमाने, लैला भाभी युवा नेते स्वप्निल व्हनमाने, आण्णासो व्हनमाने यांच्यासह सर्व नेतेमंडळी संचालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे स्वागत सदस्य अमृत पाटील व आभार जुनोनी तंटामुक्त समितीचे मा अध्यक्ष चैतन्य शेठ रुपनर  यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुनोनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.