Breaking

Saturday, 25 April 2026

शिवणे येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात गैरप्रकार; ग्रामस्थांचा संताप, कारवाईची मागणी

 


सांगोला / प्रतिनिधी - 



सांगोला तालुक्यातील शिवणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात काही समाजकंटकांकडून जुगार खेळणे, धूम्रपान करणे तसेच गुटखा सेवन करून शाळेच्या भिंतींवर थुंकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारांमुळे शाळेचे वातावरण दूषित होत असून विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच संस्कारांचे केंद्र मानली जाते. मात्र अशा गैरप्रकारांमुळे शाळेची पवित्रता बाधित होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन अशा कृत्यांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून वेळेत कारवाई न झाल्यास या प्रश्‍नावर शिवणे ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी व शाळेचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.