Breaking

Friday, 10 April 2026

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटन कार्यकारणी सदस्य पदी पश्‍चिम महाराष्ट्र विभाग सोलापूर जिल्ह्यातून अंबादास शिंदे व उत्तम चौगुले यांची निवड

 

- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभाग बैठक संपन्न 

सातारा -



: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय पदावरती पश्‍चिम महाराष्ट्र विभागातून विकास सूर्यवंशी सांगली, विजय पारगे पुणे व रघुनाथ कांबळे कोल्हापूर यांची निवड करण्यात आली. सातारा येथे राज्य संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शिवगौंड अण्णा खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली बैठकीस पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यातील राज्य संघटनेचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. सांगली जिल्हा राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून सचिन चोपडे यांची निवड जाहिर करण्यात आली.

     महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या राज्यभर संपर्क व सल्गनता असणार्‍या एकमेव अशा शिखर संघटनेची पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विभागातून राज्य संघटनेचे पदाधिकारी निवडले जात आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर राज्याच्या सात विभागातून निवडलेल्या केंद्रीय व्यवस्थापन समिती सदस्यांमधून राज्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस व खजिनदार निवडले जाणार आहेत. या अंतर्गत संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची बैठक पत्रकार भवन सातारा येथे गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शिवगोंडआण्णा खोत इचलकरंजी हे होते. यावेळी राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकारी निवड कार्यक्रमांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्र पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातून अंबादास शिंदे व उत्तम चौगुले, यांची राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड जाहीर करण्यात आली.

          

      या बैठकीचे आयोजन नियोजन सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष व राज्य संघटनेचे प्रतिनिधी राजेंद्र माळी, गणेश पवार, ताजुद्दीन आगा, गणेश पवार, भास्कर भोरे, लहुराज लवळे, हमीद खान यांनी केले. राज्य संघटनेचे सातारा प्रतिनिधी राजेंद्र माळी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.