सांगोला /प्रतिनिधी
मानवी हक्काचा लढा: हा लढा केवळ तहान भागवण्यासाठी नव्हता, तर आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि जातीभेदाविरुद्ध लढा देण्यासाठी होता.ऐतिहासिक कृती: बाबासाहेबांनी स्वतः चवदार तळ्याचे पाणी पिऊन हजारो अनुयायांसह या अन्यायी प्रथा मोडीत काढली असल्याचे प्रतिपादन अॅड. अक्षयदादा बनसोडे यांनी केले.
20 मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रह दिवशी औचित्य साधून बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या कार्यालयासमोर पानपोई उद्घाटन वेळी बोलत होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पाणपोई चे उद्घाटन झाले.
यावेळी उपस्थित शिवसेनेचे युवा नेते सागरदादा पाटील. डॉ. डोंबे साहेब. आरपीआय पलूस तालुका अध्यक्ष मा.बोधिसत्व माने ,शिवाजी पवार ,प्रतीक पाटील ,पंजाब गुजले, विशाल वाघमारे, अंकुश माने ,प्रवीण पगारे, प्रशांत गायकवाड ,बापू कांबळे, दत्ता कीर्तीके ,अतुल चंदनशिवे महादेव चंदनशिवे, वीर सावंत भीमराव बनसोडे, महादेव बनसोडे ,अक्षय वाघमारे, ओमकार बनसोडे ,अबु सव्वालाखे ,विष्णू मोहिते, प्रवीण मोहिते, स्वप्निल शिंदे ,शंभू बनसोडे ,संभाजी बनसोडे, छोटू मोरे ,प्रणव, सोनवले सोमा ,धनवडे ,संग्राम धनावडे ,संदीप बनसोडे,बापू गेजगे, शुभम साबळे ,मोदक होवाळ, बल्लू गुज्जर,मयूर भोरे तसेच संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
