सांगोला प्रतिनिधी -
गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला, अंतर्गत गुणवत्ता कमी कक्ष (इकास) व समान संधी कक्ष अंतर्गत भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारया विषयावर ऍड आशुतोष कांबळे यांचे व्याख्यान आयुक्त करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍड. आशुतोष कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, भारतीय संविधानाने महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क आणि अधिकार प्रदान केले आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतच समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या तत्त्वांचा समावेश आहे. मूलभूत हक्क मूलभूत अधिकाराची सनद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मिती पासूनचा इतिहास अधोरेखित करून भारतीय प्रत्येक नागरिकाला समान संधी दिली आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व संविधान निर्मितीचा वाटा मोलाचा आहे. मुल जन्माला येण्यापूर्वी ते त्याच्या मृत्यूपर्यंतच्या त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जाणीव संविधानाने भाल केली आहे.
तसेच ऍड . अनुजा बाबर यांनीभारतीय संविधानातील महिलांचे हक्क आणि अधिकारया विषयावर मार्गदर्शन करताना कलम 14 नुसार कायद्यापुढे सर्व समान आहेत. महिलांनीही पुरुषाप्रमाणे समान हक्क व समान संधी मिळते. स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19 कलम 21 मध्ये मिळतो. स्त्रीचे समाजामध्ये शोषण होत असेल तर कलम 23 नुसार तिला संविधानाने न्याय, हक्क मागण्याचा अधिकार आहे. तसेच महिलांसाठी विशेष कायदे केलेले आहेत. त्यापैकी घरगुती हिंसाचारापासून संरक्षण, हुंडा प्रथा बंदी, कार्यस्थळी लैंगिक छळा विषयी संरक्षण, व प्रस्तुती रजा लाभ याविषयी संविधानाने मार्गदर्शन केलेले आहे.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉ शंकर धसाडे यांनी स्पष्ट केले की, भारतीय संविधान स्त्रियांना स्वातंत्र्य, समता, सुरक्षा, आणि सन्मानाने जीवन जगण्याची अधिकार बहाल करते. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जगात श्रेष्ठ ठरले आहे. भारतीय लोकशाहीने जगाला दिशा देण्याचे काम केले आहे. मानवता व शांतता निर्माण करण्यासाठी भारतीय संविधान महत्त्वाचे आहे.
सदर कार्यक्रमास सा.ता. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख, संस्था सचिव मा. विठ्ठल रावजी शिंदे, प्राचार्य सिकंदर मुलांनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मनोज कुमार माने यांनी केलेले तर सूत्रसंचालन समान संधी कक्ष चे अरमन प्रा. अशोक कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. ज्योतीराम हूरदुके यांनी मांनले कार्यक्रमाला प्रा. पांडुरंग रुपनर, प्रा. अतुल बाबर, प्रा. सचिन खरात, प्रा. परमेश्वर शेळके, प्रा. संतोष भोसले, प्रा. सौ. जयश्री काशीद, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
