Breaking

Tuesday, 24 March 2026

महात्मा बसवेश्‍वर युवक संघटनेच्या अध्यक्षपदी सुमित चांदणे

 


सचिव पदी प्रवीण शिवपुजे तर खजिनदार संतोष गुळमिरे 



सांगोला/प्रतिनिधी::

 येथील महात्मा बसवेश्‍वर युवक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. याबैठकीत सण 2026 -27 साठी नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये सुमित मोहन चांदणे यांची अध्यक्षपदी, प्रवीण शिवपुजे सचिव तर संतोष गुळमिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महात्मा बसवेश्‍वर युवक संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी महात्मा बसवेश्‍वर महाराजांची जयंती धार्मिक वातावरणात साजरी केली जाते.त्यासाठी प्रत्येक वर्षी नवीन मंडळाची स्थापना करून संघटनेतील प्रत्येक युवकांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. सण 2026-27 मधील जयंती उत्सवासह वर्षभरातील कार्यक्रमासाठी नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी सुमित चांदणे यांचे सह पुढील अन्य पदाधिकार्‍यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. संघटनेचे उपाध्यक्ष शिवतेज पाटणे ,सचिव - प्रवीण शिवपुजे ,कार्याध्यक्ष - निरंजन बुर्ले, खजिनदार संतोष गुळमीरे, सहसचिव संदीप चौगुले,मिरवणूक प्रमुख - संजोग घोंगडे,हरी कोरे, गोपी लामगुंडे,ऋषिकेश लोखंडे,संतोष महिकर,शंभू झपके,संदेश पलसे यांची सर्वांनुमते मध्ये निवड करण्यात आली. यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील जेष्ठ मार्गदर्शक व बसवेश्‍वर युवक संघटनेचे गतवर्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.शेवटी मागील वर्षाच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले तर नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.