सांगोला महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
सांगोला / प्रतिनिधी:
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा आणि आई वडिलांचा सन्मान करायला हवा हीच खरी बहादुरी आहे हे स्पष्ट करून, आधुनिकतेचा स्वीकार करत असताना मुलींनी सक्षम होऊन आपली संस्कृती जपली पाहिजे.विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा वापर जपून करावा, कारण आजच्या युवा पिढीचा मेंदू समाजमाध्यमांमध्ये अडकतोय असे मत सुप्रसिद्ध कवयित्री कु. गुंजन (ताई) पाटील यांनी व्यक्त केले.
येथील सांगोला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ. नुकताच पार पडला, यावेळी कवयित्री कु. गुंजन पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव(भाऊ) गायकवाड यांनी भूषविले. यावेळी उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष पी.सी.झपके, सचिव अॅड.उदय(बापू) घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, संस्था सदस्य महादेव झिरपे (सर), विश्वनाथ चव्हाण, शामराव लांडगे, सुरेश फुले, सुधीर उकळे, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, वैजिनाथ घोंगडे आदी संस्था सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या विद्यार्थी स्नेहसंमेलनामध्ये बुधवार दि.11 मार्च रोजी आयोजित ‘शेलापागोटे’ कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.सुरेश भोसले यांचे हस्ते करण्यात आले. रांगोळी व मेहंदी स्पधेचे उद्घाटन संस्थासचिव अॅड. उदय ( बापू ) घोंगडे यांचे हस्ते करण्यात करण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन स्तर पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘ विविध गुणदर्शन’ कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
गुरूवार दि.12 मार्च रोजी संगीत शेलापागोटे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ‘प्रेरणा’ आणि ‘गलक्सी’ भिंतीपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या कवयित्री कु. गुंजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक,विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी,सांस्कृतिक,युवा महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा, मेहदी, रांगोळी,कथाकथन, काव्यवाचन,निबंध व वकृत्व इत्यादी विभागातील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कार्याध्यक्ष डॉ.विद्या जाधव यांनी अहवाल वाचन केले.पाहुणे परिचय डॉ. रामचंद्र पवार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे,प्रा.प्रसाद लोखंडे यांनी केले. परीक्षक डॉ.विजयकुमार गाडेकर,कला शिक्षक प्रशांत मिसाळ, सहशिक्षिका श्रध्दा तेली, सहशिक्षिका सौ. स्मिता इंगोले, प्रा.सौ. रोशनी शेवाळे, कु.आरती बेंगलोरकर, नगरसेविका सौ. सुजाता केदार, नगरसेविका सौ.आशादेवी यावलकर, माजी नगरसेविका सौ. शोभा घोंगडे यांचेसह सर्व संस्था पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, साहित्यप्रेमी नागरिक, पत्रकार, सेवानिवृत्त प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,विद्यार्थी उपस्थित होते. आभार डॉ.अमोल पवार यांनी मानले. हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रामचंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ.विद्या जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे, प्रा.स्वप्निल शहा, प्रा. सौ. सोनल भुंजे, डॉ.भारत पवार, अधिक्षक विलास माने यांचेसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
काव्यमय समाजप्रबोधणामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध
त्यांच्या ‘प्रेमातला भ्रष्टाचार’, ‘बायको’, ‘ती त्याच्या लग्नाला जाते तेव्हा’, ‘मला आई व्हायचं नाही’ व ‘राम’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कवितांना श्रोत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यांचे शब्दावरील प्रभुत्व आणि हृदयस्पर्शी काव्यमय समाजप्रबोधन यामुळे श्रोते चांगलेच मंत्रमुग्ध झाले होते.
