Breaking

Wednesday, 11 February 2026

कडलास जि.प. सदस्या शोभाताई खटकाळें यांच्या हस्ते शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन


सांगोला/प्रतिनिधी : 



शिवधर्म दिनदर्शिकेचे सांगोला येथे नूतन जिल्हा परिषद सदस्या शोभा खटकाळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब खटकाळे, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. विठ्ठलराव जाधव, बाळासाहेब आसबे उपस्थित होते.

बहुजनांना महामानवांची माहिती व्हावी या दृष्टीने या दिनदर्शिकेत विविध माहिती संकलित केली आहे.

या तेरा पानी रंगीत दिनदर्शिकिमध्ये अनेक उपयुक्त संपर्क उपलब्ध केले आहेत. सत्यशोधक विचाराचे ज्येष्ठ विचारवंत लेखक शरद पाटील यांच्या बद्दलची माहिती विस्ताराने दिनदर्शिकत देण्यात आली आहे. समाज प्रबोधनाच्या दृष्टीने पुणे जिल्हा मराठा सेवा संघ, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक सदस्य अ‍ॅड. विठ्ठलराव जाधव यांनी सांगोल्यात हा प्रकाशनाचा उपक्रम घडवून आणला. यावेळी अकोला(वासुद), वाटंबरे, सांगोला शहर, कडलास, जवळा आदी भागात या कॅलेण्डरचा विक्रमी खप झाला. असल्याचे अ‍ॅड. विठ्ठलराव जाधव यांनी सांगितले.