माडगुळे येथे गदिमा शिदोरी साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण संपंन्न ...
नाझरे /प्रतिनिधी -
माडगूळच्या या मातीने गदिमा आणि व्यंकटेश तात्या अशा थोर साहित्यिकांची जडणघडण केली. आज गदिमांच्या नावाने मला दिला जाणार पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाच आहे. माडगूळ मातीने मलाही समृद्ध केले आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी व बघते इंद्रजीत भालेराव यांनी केले.
माडगुळे येथे बामणाच्या पत्र्यावर अमरसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गदिमा शिदोरी साहित्य संमेलनात ते बोलत होते.
साहित्यिक मा.इंद्रजीत भालेराव यांना मा.अमरसिंह देशमुख यांचे शुभहस्ते ग.दि.माडगूळकर साहित्य प्रतिभा पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आले.तसेच मा.गजानन राजमाने यांना मा.अड.रविंद्र माडगूळकर यांचे शुभहस्ते व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव हा सन्मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्याचबरोबर जेष्ठ लेखक अजित पुरोहीत यांना जेष्ठ लेखक मा.रघुराज मेटकरी यांचे शुभहस्ते ब.शंकरराव खरात साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानीत केले.सदर संमेलनाचे उद्धाटन माडगुळे गावच्या लोकनियुक्त सरपंच संगिता गवळी यांनी केले.यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात अमरसिंह देशमुख यांनी संमेलनाच्या आयोजन नियोजन व उत्तरोत्तर वाढत जाणार्या व्याप्तीबद्दल आनंद व समाधान व्यक्त करून हे संमेलन माणदेशाच्या उज्वल साहित्यिक परंपरेला साजेस होणार आहे त्यासाठी लागेल ते सहकार्य करू असे आश्वस्त केले.
पुढे इंद्रजीत भालेराव यांनी गदिमा,व्यंकटेश माडगूळकर व मा.शंकरराव खरात यांच्या साहित्याचे अनेक दाखले दिले.गदिमांची अनेक गाणी व कविता उद्घत केल्या व जी माती मी आजवर नेहमी कपाळी लावली त्या मातीने व तेथील माणसांनी आज खांद्यावर घेतले.हा सन्मान मी आजवरच्या सन्मानातील सर्वात मोठा सन्मान मानतो अशा भावना व्यक्त केल्या.मा.गजानन राजमाने यांनी हा पुरस्कार माझ्याकरिता खूप मोठा सन्मान आहे असे मी मानतो असे म्हणत कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.पहिलाच पुरस्कार आणि तोही व्यंकटेश माडगूळकर यांच्या नावाचा मिळतो या जबाबदारीचे मला नक्कीच भान राहिल असा विश्वास त्यांनी दिला.मा.अजीत पुरोहीत यांनी ह्या पुरस्काराने मी भारावून गेलो आहेच.शिवाय बामणाच्या पत्र्यावरती मला पुस्तक प्रकाशीत करता आले याचा खूपच आनंद आहे असे भावोद्गार काढले. मां.रविंद्र माडगूळकर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले तर गझलकार सुधाकर इनामदार यांनी प्रास्ताविकामध्ये संमेलन घेण्यामागची भूमिका विशद केली.यावेळी सुभाषबापू पाटील,विश्वनाथ गायकवाड,धर्मेंद्र पवार,पद्माकर यादव, राजेंद्र भोसले ,बाबुराव विभूते,मा.विठ्ठल गवळी,शरण्या भिसे-देशपांडे, सुहास देशपांडे, सुजाता देशपांडे ,श्रुती इनामदार,. देशमुख मडम व चांडवले मडम,पुष्पलता मिसाळ,अरूणा चव्हाण व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीकृष्ण पडळकर यांनी केले.
दुसर्या सत्रातील कवीसंमेलन धनाजी पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपंन्न झाले.त्यामध्ये विनायक कुलकर्णी ,आनंदराव जाधव,शिवाजी बंडगर,ज्ञानेश डोंगरे, अनिल पाटील ,स्मिता शिंदे,सुशिला नांगरे,हरीभाऊ गळवे, आनंदहरी,सुनील तोरणे,सुनील दबडे,रमेश जावीर,एम.बी.जमादार, व्ही.एन.देशमुख, रावसाहेब यादव, गौसपाक मुलाणी,अशा अनेक कवींनी आपल्या कवीता सादर केल्या.सुत्रसंचलन मा.सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार दिनेश देशमुख यांनी मानले.
