Breaking

Wednesday, 11 February 2026

सांगोला महाविदयालयातील कु. किरण राजमाने हिची खेलो इंडिया साठी निवड

सांगोला/प्रतिनिधी : 



ऑल इंडिया युनिव्हर्सिटी 10 मीटर रायफल शूटिंग (महिला) स्पर्धा सुभारती विद्यापीठ, मेरठ येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पाचवे स्थान प्राप्त केले.संघाने ‘खेलो इंडियास्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्याचबरोबर सांगोला महाविद्यालय सांगोला ची विद्यार्थिनी कुमारी किरण राजमाने हिची वैयक्तिक 10 मीटर रायफल शूटिंग क्रीडा प्रकारामध्येखेलो इंडियासाठी निवड झाली.

या यशाबदद्ल संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार व श्री प्रा.पी.सी. झपके, खजिनदार श्री. नागेश गुळमिरे, सचिव अ‍ॅड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनीव महाविद्यालयातील या खेळाडूस मार्गदर्शन करणारे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व क्रीडा शिक्षक प्रा. जगदीश चेडे यांनी खेळाडूचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, क्रीडा समिती सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर खेळाडूस सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.