Breaking

Wednesday, 11 February 2026

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा 40 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


सांगोला/प्रतिनिधी ः 




आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगोना या संस्थेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद कार्यक्रम अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या 40 वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. सहकाराच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

या मंगलप्रसंगी संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास सांगोला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

विना सहकार नाही उद्धार या ब्रीदवाक्याप्रमाणे संस्था भविष्यातही कार्य करत राहील, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने, कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.