Breaking

Monday, 9 February 2026

तळागाळातील जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडुन जनतेच्या प्रश्‍नांना आवाज देणे हीच खरी पत्रकारिता ; उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर

 

सांगोला/प्रतिनिधी 



लोकशाहीत व्यवस्थेत पत्रकार हा केवळ बातमीदार नसून जनतेचा आवाज आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील तळागाळातील जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडुन जनतेच्या प्रश्‍नांना आवाज देणे हीच खरी पत्रकारिता असल्याचेप्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र 65135 भाई छन्नुसिंह चंदले समाजकार्य महाविद्यालय सोलापूरयेथे 8 फेब्रुवारी 2026या कार्यक्रमाची सुरवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन पत्रकार कार्यशाळेला सुरवात झाली

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर होत्या.

यावेळी विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र सचिवा मनीषा पाटील, नूतन नगरसेविका अश्‍विनी चव्हाण, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ जर्नलिजम प्रा डॉ. अंबादास भासके, दैनिक एकमतचेसंपादक संजय येऊलकर, अरुण धोत्रे,महादेव देवकर, प्रकल्प व्यवस्थापक बार्टी प्रा. अंकुश गायकवाड, प्रा.विजयकुमार लोंढे, दैनिक संचार उपसंपादक नंदकुमार येच्चेयांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना देवकर म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडींवर लक्ष ठेवून सत्य घटना समाजासमोर मांडण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे. महानगरपालिकेकडून पत्रकारांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. पत्रकारांनी प्रामाणिकपणे कार्य करत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कार्यशाळेत पत्रकारितेतील बदलती प्रवृत्ती, जबाबदार्‍या आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावावरही मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी विद्यार्थीमनोगत हेमंतकुमार बगले, संजय चव्हाण, कैलास गोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले तर आभार राजेंद्र मुलगे यांनी मानले या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

केंद्र सरकारने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रा विजयकुमार लोंढे नावाने 500 रू पोस्ट तिकीट जाहीर केले आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ हार फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

 संस्थापिका अध्यक्षा माजी महापौर नलिनी चंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉलेज ची यशस्वी वाटचाल चालु आहे या कॉलेजमधून आतापर्यंत हजारे विद्यार्थी घडवले आहेत हे विद्यार्थीशासकीय निमशासकीय नोकरीला विद्यार्थी लागले आहेत.पत्रकारांनी सत्तचे सेवक होऊ नका तर सत्याचे सेवक व्हा

मनिषा पाटील 

विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र सोलापूर सचिवा