Breaking

Friday, 13 February 2026

जवळा येथील श्री क्षेत्र नारायण देव महाशिवरात्री यात्रेमध्ये सर्व भाविक भक्तानी सहभागी व्हावे ः शशीकांतभाऊ देशमुख

 

सांगोला/प्रतिनिधी ः 






जवळा, ता. सांगोला येथे दरवर्षी श्री क्षेत्र नारायणदेव महाशिवरात्र यात्रा आयोजक, ग्रा.पं. सदस्य शशीकांतभाऊ देशमुख यांचे कुंटूबियांच्यावतीने ग्रामस्थ व व्यापारी बांधवाच्या सहभागाने भव्य प्रमाणात भरविली जाते. सालाबादप्रमाणे याही वर्षी उद्या रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक शशिकांतभाऊ देशमुख यांनी दिली. 

यामध्ये रविवारी पहाटे श्री नारायणदेवास महाअभिषेक व प्रसाद वाटप. दुपारी 3 वाजता जवळा गावामधून श्री नारायणदेव पालखीची भव्य दिव्य मिरवणूक (छबीना) निघणार आहे. त्यामध्ये श्री सोनार सिध्दनाथ पालखी जवळा, आगलावेवाडी गावातील श्रीक्षेत्र म्हसोबा देवस्थान पालखी, बुरंगेवाडी गावातील मायाक्कादेवी पालखी व यल्लमादेवी पालखी, गावातील करसिद्ध देवाची पालखी, ह्या सर्व पालख्या सहभागी होणार आहेत. भव्य मिरवणूकीत बँडपथक, वारकरी पथक, लेझिम पथक, सनई चौघडा पथक, बँजो पथके, गजी ढोल पथक, इ. नामवंत वाद्ये व उंट घोड्यासह इतर कलावंत सहभागी होणार आहेत. सोबत शोभेचे दारुकाम होणार आहे. तरी जवळा व तालुक्यातील परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा आयोजन शशिकांतभाऊ देशमुख यानी केले आहे.