Breaking

Sunday, 22 February 2026

माळशिरस तालुक्यातील खुळेवाडीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या आत्महत्या पूर्वी हातावर लिहिली सुसाईड नोट आत्महत्यास प्रवृत्त केल्याने पती सासू-सासरे यांचे विरुद्ध नातेपुते पोलिसात फिर्याद दाखल

 


नातेपुते प्रतिनिधी : 



माळशिरस तालुक्यातील नातेपुते जवळील खुळेवाडीमध्ये पायल शशिकांत रणदिवे ही विवाहीत महिला राहात होती. शशिकांत रणदिवे यांच्यासोबत तिने लग्न केले होते. तिने टोकाचे पाऊल उचलत घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे पायलचा नवरा आणि सासू सासर्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार आहे. या तक्रारीवरून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या आत्महत्या प्रकरणात खरा ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळी पायलच्या हातावर तिची सुसाईड नोट सापडली. 

       पायलने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्‍न ही निर्माण होत आहेत. ती लिहीते की हसू झालं गं माझं. माझं पार्लर बंद केलं. जीव होता तो माझा. स्वप्न होतं गं. आज पर्यंत शांत बसले. पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे. म्हणून निघून पण नाही गेले. माझ्या मुळे त्रास झाला त्यासाठी माफी मागते. सॉरी अशी सुसाईड नोट तिच्या हातावर आहे. या थेट तिने कोणाला ही ब्लेम केला नाही. पण तिचा रोख तिच्या सासरच्या लोकांकडे आहे असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.      

        पायलला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. शिवाय तिच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर ही हत्या असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. याबाबत नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 62/2026 बी एन एस 2023 चे कलम 108,85,115,(2)352,351(2)3(5)  प्रमाणे फिर्यादी- अंकुश रामचंद्र लोंढे वय - 43 व्यवसाय- मजुरी रा- बाबरीपुल महाळुंग ता. माळशिरस जि. सोलापूर आरोपी :-1) शशिकांत मारुती रणदिवे 2) मारुती दामू रणदिवे 3) छाया मारुती रणदिवे  

4) कैलास मारुती रणदिवे सर्व रा. खुळेवाडी ता. माळशिरस मयत नामे - पायल शशिकांत रणदिवे वय 22  वर्ष रा- खुळेवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर 

 गु.घ.ता.वेळ व ठिकाण व वेळ - 21/03/2026 रोजी 23/30 पासून ते दिनांक21/02/2026  रोजी 23/30 वाचे सुमारास राहते घरी खुळेवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ -दि-22/02/2026  रोजी 00/44 वाजता

तपास- मा.सपोनि/ वायकर सो 

दि.21/02/2026 रोजी सायंकाळी 06/30 वाचे सुमारास खुळेवाडी तालुका माळशिरस येथील फिर्यादी यांची मयत मुलगी नामे पायल शशिकांत रणदिवे वय- 22 वर्ष रा. खुळेवाडी ता. माळशिरस हिने राहत्या घरामध्ये तिचे पती शशिकांत मारुती रणदिवे, सासरा मारुती दामू रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे, दीर कैलास मारुती रणदिवे सर्व रा. खुळेवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी घरगुती कारणावरून तिचे पती शशिकांत यांनी वेळोवेळी मारहाण करून तसेच तिची सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कारणावरून शारीरिक मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे म्हणून फिर्यादीची वरील लोका विरुद्ध तक्रार आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर करीत आहे