Breaking

Sunday, 22 February 2026

सीबीएस न्यूज मराठी यांचे तर्फे सौ संगीता उत्तम चौगुले यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

 

सांगोला (प्रतिनिधी):- 



सीबीएस न्यूज मराठी यांचे सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल विविध पुरस्कार जाहीर करण्यात आली सांगोला येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीता उत्तम चौगुले यांना *समाज भूषण* हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार मॉडल डान्सर रोशनी हिराबेन आणि डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांचे हस्ते देण्यात आला.

सौ संगीता चौगुले यांनी माजी सैनिक यांच्या महिलांना एकत्र करून महिला बचत गट स्थापन करून गेली सहा वर्षे त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना एकत्र करून बचत गट नगरपालिकेला जोडून त्यांना विविध योजनाचा लाभ मिळवून देणे. महिलांना येणार्‍या विविध अडचणी भाडण तंटे सोडविणे आणि योग्य तो न्याय मिळवून देणे हे कार्य त्या नेहमी करत असतात तसेच इनर व्हील क्लब सांगोला यांच्या त्या सचिव पदावर कार्यरत आहेत. महिलांचा जेथे जेथे सहभाग पाहिजे तेथे आपली उपस्थिती दाखवून कार्य करत असतात.शिवजयंती असो महिला हळदीकुंकू नगरपालिका उपक्रम, राष्ट्रीय सण, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, कारगिल दिवस, राज्यस्तरीय मेळावे, अन्याय झालेला असेल तर न्याय मिळाला पाहिजे याकडे आपला कटाक्ष टाकणं इत्यादी कामात यांचे कार्य चालू आहे आणि त्या एक पेपर विक्रेत्या व पत्रकारिताचे पण काम करतात कोणतेही काम मदत त्या मनापासून अगदी मनापासून करतात. 

सत्काराला उत्तर देताना सौ संगीता यांनी माझ्या मुलांची व अहो ची साथ आहे आणि माझे समाजाच्यासाठी जे माझे कर्तव्य आहे ती करते आणि असे पुरस्कार मिळाल्यामुळे मला माझे कार्य आणखी उत्साहात करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले धन्यवाद चांद भाई.