कोळा वार्ताहर
सांगोला तालुक्यातील कोळा येथील महादेव मंदिर ग्रामपंचायत कार्यालय जवळ असलेल्या दत्त मंदिरात लोकसभागातून दत्त मुर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे श्री श्री श्री 108 निर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व श्री तपोनिधी कल्याणगिरी उर्फ भास्करगिरी महाराज शुक्राचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कोळा येथे निर्माण चौकातील दत्त मंदिरामध्ये लोकसभागातून तसेच उद्योजक नवनाथ कोरे यांच्याकडून 51 हजार रुपयाची दत्त महाराजांची मूर्ती तसेच विष्णू माने व माने इंटरप्रायजेच्या वतीने मंदिराची सुशोभीकरण फरशी बसवून तसेच दत्त चारिटेबल ट्रस्टच्या वतीने जवळपास दीड लाख रुपये खर्चून मंदिराचे सुशोभीकरण काम झाले आहे. दिनांक दि.24/02/2026 स. 9 वाजता मूर्ती अभिषेक व अनी होम दि.25/02/2026 सायं 4 वाजता श्री दत्त मूर्ती मिरवणूक तसेच या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली या कार्यक्रमासाठी श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट कोळे सर्व सदस्य सभासद ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
