Breaking

Friday, 27 February 2026

सांगोला महाविद्यालयाची संशोधक विद्यार्थीनी प्रणाली उमराणीकर यांना बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड*.

 

सांगोला/प्रतिनिधी -



दिनांक 25/02/2026 रोजी राजे रामराव महाविद्यालय, जत, जिल्हा सांगली येथे इमर्जिंग ट्रेंड्स इन इंटर-डिसिप्लिनरी सायंटिफिक रिसर्च फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. सदर परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेतील सर्व विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा मार्फत करण्यात आले होते. 

या परिषदेमध्ये सांगोला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र संशोधन केंद्रात पीएच.डी. चे संशोधन करीत असलेल्या कु. प्रणाली उमराणीकर यांनी आयोनिक लिक्विड सपोर्टेड फेज कॅटेलाइज्ड मल्टी कंपोनंट सिंथेसिस, बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन अँड इन सिलिको स्टडीज ऑफ पायरॅनो पिरिमिडीनस हा संशोधन पेपर सादर केला. संशोधनाची गुणवत्ता व उत्कृष्ट सादरीकरण या बाबी लक्षात घेऊन तज्ञांकडून सदर पेपर प्रेझेंटेशन साठी प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. कु. प्रणाली उमराणीकर सांगोला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक व संशोधन व विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. चे संशोधन पूर्ण करीत आहेत. त्यांचे पीएच.डी. चे संशोधन कार्य पिरिमिडीन, संबंधित संयुगे व त्यांचा मधुमेह व कॅन्सर सारख्या असाध्य रोगांसाठी औषध निर्मिती साठी वापर या विषयी आहे. त्यांना सदर पारितोषिक शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. जी. बी. कोळेकर व प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांचे हस्ते देण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सेक्रेटरी उदय बापू घोंगडे, संस्था उपाध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पाटील, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग यांनी अभिनंदन केले.